Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज

Jul 23, 2022

मुंबई, दि. २२ : नवे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ आता सुरु होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.

अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरीजम, पत्रकारीता, मास मिडीया, चित्रपट निर्मितीशी संबंधीत विविध व्यावसायीक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १६ ते ३२ वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी ९८ हजार रुपयांपेक्षा कमी असावी. राज्य शासनामार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असून यामधून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १८ ते ३२ वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत असावी, अशा अटी आहेत. दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त ३ टक्के इतका आहे. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील ५ वर्षात कर्जाची परतफेड करायची आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावरील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जिल्हास्तरीय कार्यालयांची तसेच योजनेची माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल. राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधावा किंवा ०२२-२२६५७९८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

१७ सिमकार्ड,६ आधार कार्ड,१ पासपोर्ट,१ टॅब,१ मोबाईलसह दिल्लीच्या तरुणास अटक – मनमाड लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

काकीनाडा एक्स्प्रेस मध्ये संशयास्पदरीत्या प्रवास करत असताना दिल्ली येथील २३ वर्षीय संशयित तरुणास...

read more

राज्यातील सर्व नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एक वार्ड ऐवजी 2 वार्ड एक प्रभाग पद्धत लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय…मनमाडला आता राहणार दोन वार्डाचा एक प्रभाग..एक प्रभाग मधून दोन नगरसेवक जाणार निवडून

बिग ब्रेकिंगराज्यातील सर्व नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एक वार्ड ऐवजी 2 वार्ड एक प्रभाग पद्धत...

read more
वागदर्डी धरण तुडुंब भरले….ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर

श्री सिद्धीविनायक मंदिराचे अध्यक्ष (रिलायन्स )आदेश बांदेकर साहेब ह्यांच्या तर्फे नांदगाव पूरग्रस्थांना मदत

नांदगाव मतदार संघात अतिवृष्टीमुळे उध्वस्थ झालेले संसार आणि विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वी...

read more

नांदगावला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
पूरग्रस्त भागांची केली पाहणी
प्रस्ताव तत्काळ मंजुरीसाठी पाठविणार – मांढरे

नांदगाव शहरावर उद्भवलेल्या संकटाने अनेक नागरिकांना आपली घरे, दुकाने तसेच अनेकांचे संसार उध्वस्त...

read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना भेटी. शासन नियमानुसार भरपाई देणार – ना.भुसे

नांदगाव तालुक्यात अतीवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतमालाचे झालेले नुकसान सहन न...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]