Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केंद्रीय विद्यालय मनमाड : दहावीत हर्षदा लाड प्रथम

Jul 25, 2022

दिनांक २२ जुलै रोजी इयत्ता दहावीचा सीबीएससी चा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत मनमाडच्या केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. ६५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तम गुण संपादन करून यशस्वी झाले. हर्षदा लाड ९३.४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम, वंश कातकडे ९१. ६ टक्के गुण द्वितीय आला. तसेच मोक्षिता भंडारी व श्रेयस घाडगे ९१.२ टक्के तृतीय क्रमांक व आदिती देव ८९.६ टक्के मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला. मोहित लुनावत याने ८५.४ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे रेल्वे कारखान्याचे मुख्य प्रबंधक व केंद्रीय विद्यालयाचे चेअरमन मयंक सिंग, प्राचार्य सुनील परदेशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य सुनील परदेशी, विनोद माळी, अनिल झिंजवाडिया, मनोज मलासी, दिनेश जांगिड , सोनाली गुंडगळ इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या शुभहस्ते अमित भारत गॅस एजन्सी यांच्या वतीने प्रधानमंत्री उज्वला २.० योजने अंतर्गत गॅस वितरण समारंभ

आज पारेगाव ता.चांदवड येथे अमित भारत गॅस एजन्सी यांच्या वतीने प्रधानमंत्री उज्वला २.० योजने अंतर्गत...

read more

नांदगाव तालुका भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास (रानेणसिध्दी) मनमाड शहरात आढावा बैठक संपन्न

मनमाड शहरात नांदगाव तालुका भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास आढावा बैठक जिल्हाध्यक्ष बाळा साहेब...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]