loader image
[ays_poll id=7]

नगरसुल येथील अंडरपास ची समस्या लवकरच मार्गी लागणार

Aug 1, 2022


दक्षिण मध्य रेल्वे विभागातील शिर्डीला जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी महत्त्वाचे व शेवटचे स्थानक असलेले नगरसुल रेल्वे स्टेशन येथे आज रेल्वे अधिकारी विनोद आर्या. जनार्धन बालमूज assistant divinsion औरंगाबाद, तसेच भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाअध्यक्ष Drucc सदस्य समीर समदडिया यांनी भेट दिली.

येवला नांदगाव राज्य महामार्ग क्र.25 वर रेल्वे गेट क्र.8 बंद करून तयार करण्यात आलेला अंडरपास बाबत दरवर्षी पावसाळ्यात अडचणी निर्माण होत असतात.यावेळेस ही या ठिकाणी असलेल्या अंडरपास मध्ये पाणी साचल्याने अनेक समस्या स्थानिक रहिवासी सुनील पैठणकर,विनोद पाटील. सरपंच प्रसाद पाटील.दिनेश आव्हाड उद्धव निकम यांनी मांडल्या होत्या..याबाबत केंद्रीय मंत्री भारती पवार यांना अवगत करून ही समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती रेल्वे सल्लागार समिती सदस्य समीर समदडीया यांनी केली.
मंत्री महोदया भारतीताई पवार यांनी तात्काळ दखल घेत रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज दि.1 ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी अकराच्या दरम्यान रेल्वेचे उच्च अधिकारी जनार्दन बाबलूज ,विनोदकुमार आर्या यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित समस्या तांत्रिक पद्धतीने तात्काळ निराकरण करण्याचे सूचित केले.यावेळेस भाजपा चे राजू परदेशी, भाजपा येवला तालुकाअध्यक्ष नंदू शिंदे सुनिल पैठणकर, विनोद पाटील,दत्ताभाऊ सानप,संतोष काटे यांचेसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.