loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) शिवसेना नेते खासदार संजय राऊत याना ईडीने अटक केल्याने आज मनमाड मध्ये निषेध रॅली

Aug 1, 2022


शिवसेना नेते खासदार संजय राऊत याना ईडीने अटक केल्याने आज मनमाड मध्ये निषेध रॅली काढण्यात येऊन एकात्मता चौकात निषेध करण्यात आला. राऊत यांना सूडबुद्धीने ईडीकडून अटक करण्यात आल्याचा आरोप करत संतप्त शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. या आंदोलनात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अल्ताफ खान, गणेश धात्रक ,संतोष बळीद, पिंटू नाईक, महिला आघाडीच्या मुक्ताबाई नलावडे, मयूर बोरसे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आपल्या संतप्त भावना व्यक्त करून बेताल वक्तव्य करणाऱ्या मराठी द्वेष्ट्या राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सह ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध नोंदविला. अनेक जण शिवसेना सोडून बाहेर गेले असले तरी आम्ही संजय राऊत यांच्या सोबत असल्याच्या प्रतिक्रिया या वेळी व्यक्त करण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.