loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर ; अनेक ठिकाणी युवकांनी मारली बाजी

Aug 6, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव तालुक्यातील फुलेनगर, क्रांतीनगर, गिरणानगर, मल्हारवाडी, हिंगणवाडी आदी  ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून अनेक ठिकाणी युवकांनी बाजी मारली आहे. नवीन तहसील कार्यालयात मतमोजणीला सकाळी 10 वाजेपासून सुरुवात झाली.पहिला निकाल गिरणानगर ग्रामपंचायतीचा लागला.गिरणानगर ग्रामपंचायती चे उमेदवार सुनील सोनवणे यांनी तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. सुनील येथील माहीती अधिकार कार्यकर्ता असून त्याने तत्कालीन महसुल मंत्री ना. नारायण राणे हे नांदग़ाव येथे निवडणूकी च्या प्रचारा दरम्यान आले असतानां त्यांना भर सभेत कांदे फेकून मारले होते .गिरणानगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुनील सोनवणे तसेच येथील युवा फांऊडेशन चे अध्यक्ष सुमीत सोनवणे यांच्या मातोश्री सुनंदा सोनवणे या विजयी झाल्या .

मल्हारवाडी ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप व माजी आ. पकंज भुजबळ यांचे खंदे समर्थक दिपक खैरणार व पत्रकार संदीप जेजुरकर यांच्या एकत्रीत पॅनल ने बाजी मारत एकतर्फी विजय मिळविला.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय राजकारणाला फाटा देण्यात आला असला तरी तरुण पुढाऱ्यांच्या पॅनलला चांगले यश मिळून आल्याचे चित्र दिसून येत आहे.
नांदगाव तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायत यापूर्वी बिनविरोध झाली असून त्यावर आ. सुहास कांदे यांचे समर्थक विष्णू निकम सर यांच्या समर्थकांनी बाजी मारली आहे.  तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींवर नवे कारभारी निवडून

आले असून दिवसभर सर्वच राजकीय पक्षांमध्ये आपलाच झेंडा जास्त ग्रामपंचायतींवर फडकल्याचे दावे करण्यात येत होते.
तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीसाठी ५९ ग्रामपंचायत सदस्यांची आज निवड झाली .निवडणुका चुरशीच्या वातावरणात लढल्या गेल्या. असल्याने निकाल ऐकण्यासाठी येथील प्रशासकीय संकुलाच्या आवारा बाहेर मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणुकीसाठी उभे उमेदवार, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दी होईल हे लक्षात घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. काहीजणांनी विजयी उमेदवारासाठी हारतुरे, वाजंत्री, फटाक्‍यांची व्यवस्था केली होती.  मतदान केंद्राच्या आवारात अशा प्रकारांना मनाई असल्यामुळे केवळ हार घालून अभिनंदन करून मग गावात जाऊन अनेकांनी आनंद साजरा केला. 
विजयी उमेदवार पुढील प्रेमाणे

१) गिरणानगर ग्रामपंचायत

१) अहिरे प्रमिला
२)दळवी योगेश (बिनविरोध)
३)आहेर अनिल
४) आहेर कोमल
५) सोनावणे सुनंदा
६)सोनवणे सुनिल
७)सरोदे उमेशकुमार
८)कुटे वैशाली 
९)दळवी योगेश (बिनविरोध)
१०)अनिता पवार(बिनविरोध)
११)सुमन ठाकरे(बिनविरोध)

२)मल्हारवाडी ग्रामपंचायत

१)मीना गोविंद
२)सरला काकळीज
३)सारिका जेजूरकर
४)सुनंदा झेंडे
५) अश्विनी खैरणार
६)दिपक खैरनार
७)चित्रा इघे
८)राहुल पवार(बिनविरोध)
९) शोभा पिठे व ताई जाधव यांना समान १५८ मते पडल्याने चिठ्ठी द्वारे शोभा पिठे विजयी .

३)क्रांतीनगर ग्रामपंचायत

१)प्रियंका पाटील
२)बेबी पाटील
३)सचिन मोकळ
४)पुनम जेजूरकर
५)संगिता नरोटे
६)कडुबाई काळे
७)इंदू बाई गायकवाड
८)युवराज डोळे

४) फुलेनगर ग्रामपंचायत

१)शितल जगधने
२jरामदास जगधने
३)हिराबाई माळी
४ ) मिना माळी
५)उषा बाई पाटील (बिनविरोध)
दोन जागा रिक्त

५) हिंगणवाडी ग्रामपंचायत

१ )मनोहर खंबायत
२)अनुसया गायकवाड
३)जनाबाई शिंदे
४)कांताबाई खंबायत
५) संभाजी बच्छाव
६)जयराम डोळे
७ )मनिषा डोळे( बिनविरोध)


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.