loader image
[ays_poll id=7]

हर घर संविधान उपक्रमातुन संविधानाचा जागर करणार : शरद शेजवळ

Aug 7, 2022


पिंपळगांव बसवंत (प्रतिनिधी) :एखादे राष्ट्र धर्माच्या नांवे स्थापित होईल,होतेही परंतु देश अखंड आणि सार्वभौम राहण्याकरिता देशाला लोकव्यापी संविधान-राज्यघटना आवश्यक असते तेच काम भारतीय संविधानाने केले असून राष्ट्र धर्मावर चालत नाही तर त्या देशाची राज्यघटना (कायदे-कलम) अर्थात संविधानावर चालते असे प्रतिपादन संविधान संवर्धक महेंद्र गायकवाड यांनी केले.हर घर संविधान उपक्रमातुन संविधानाचा जागर करणार असल्याचे मत संविधान साक्षरता-संवर्धन अभियानचे मुख्य प्रवर्तक शरद शेजवळ यांनी केले. राष्ट्र सेवा दला,संविधान साक्षरता-संवर्धक अभियानच्या वतीने पिंपळगांव बसवंत येथे हर घर संविधान व संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळेचे आयोजन येथील स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स,येथे नाशिक जिल्हा स्तरीय संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळा व “हर घर संविधान” उपक्रम उदघाटन शरद शेजवळ बोलत होते. भारतीय संविधान निर्मिती पूर्व इतिहास-संविधान निर्माण प्रक्रिया,संविधान सभेची स्थापना,मसुदा समितीचे कार्य,भारतीय संविधानाची उद्देशिका,संविधानाने भारतीयांना काय दिले ?,भारतीय संविधान संवर्धन-प्रचारक होणे व हर घर संविधान घेऊन जाण्याची गरज,संविधान संवर्धन व प्रचार-प्रसार/ भारतीयांच्या जबाबदाऱ्या या बद्दल सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.भारतीय संविधानाप्रति आपली बांधीलकी व हक्क अधिकाराबद्दल जाणीव जागृती अधिक दृढ करण्याकरता संविधान संवर्धक व हर घर संविधान उपक्रमात जिल्ह्यातील संविधान प्रेमी कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगांव बसवंत चे प्राचार्य दिनेश अनारसे अध्यक्षस्थानी होते.प्रथमेश शिंदे,वेदांत बनकर यांनी हर घर संविधान व संविधान संवर्धक कार्यशाळेचे उदघाटन केले.


कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद शेजवळ यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मामा अहिरे,दादा वानखेडे,खंडू कोतकर यांनी परिश्रम घेतले.
ह्या वेळी सिद्धार्थ पवार,कार्तिक खोडे,ओम निफाडे,राज गांगुर्डे,सुदर्शन गायकवाड,सुरज जाधव,शुभम मोगल,हर्षवर्धन संकपाळ, मानस माळी,भूषण गांगुर्डे,रोहित गांगुर्डे, आकाश गुमणार, सुदर्शन गांगुर्डे, ऋग्वेद गवळी,यश पगार,धनंजय शिंदे,कमलेश शिंदे,संकेत जाधव,तेजस बर्डे,प्रतीक सोनवणे,संभाजी बोरगुडे,उत्कर्ष आव्हाड आदी संविधान संवर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.