loader image
[ays_poll id=7]

केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात मनमाड ला वीज कर्मचारी संघटनांचे कामबंद आंदोलन

Aug 9, 2022

वीज दुरुस्ती विधयेक २०२२ लोकसभेत एकतर्फी मंजूर करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात मनमाड वीज वितरणच्या विभागीय कार्यलयसमोर सर्व कर्मचारी संघटनेच्या कृती समितीने द्वारसभा घेत निदर्शने केली. यावेळी “विद्युत कायदा ” रद्द झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली. मनमाड – येवला रोड वरील कॅम्प विभागात असलेल्या कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत तीव्र निदर्शने केली.तसेच त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन पाठवण्यात आले. संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार वीज दुरूस्ती विधेयक आणणार आहे. आणि ते मंजूर करणार आहे.पण या कायद्याकडे वीज ग्राहक , कर्मचारी आणि अभियंते यांच्यावर दुरगामी परिणाम होणार आहे.मागील वर्षी केंद्र सरकारने या संदर्भात आश्वासन दिले होते.शेतकऱ्यांसह सर्व संबंधितांशी सल्ला मसलत केल्या शिवाय हे विधेयक संसदेत आणले जाणार नाही.हे आश्वासन दिले होते.पण आता संसदेत मांडून मंजूर करण्याचा एकतर्फी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.हे आश्वासनाचे उल्लंघन आहे.या विधेयकाबाबत केंद्र सरकारने महावितरणचे अधिकारी , कर्मचारी यांच्याशी चर्चा केली नाही . त्यामुळे दिल्ली येथे झालेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी , अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ व वीज क्षेत्राचे भविष्यातील खाजगीकरण रोखण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला होता.या अंतर्गत कामगाराने निदर्शने केली. सोमवारी काम बंद आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली.यावेळी अनिल सोनवणे, संदीप डगळे,संजय कुमावत, दत्ता खाडे, दत्ता काळे,भगवान शिंदे, योगेश खताळ,दत्तात्रय काळे, पुरुषोत्तम गायकवाड, सुशांत वाणी आदीसह मोठ्या संख्येने वीज कंपनीचे कर्मचारी , अभियंता सहभागी झाले होते.या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयाचे कामकाज मोठ्या प्रमाणावर ठप्प झाले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.