loader image
[ays_poll id=7]

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे घ्याव्यात ; राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात याचिका

Aug 10, 2022


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेण्यात याव्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. आज दिल्लीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप याचिका दाखल करणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उशीर करत असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांमध्ये निवडणुका घ्या असे आदेश दिले होते. असे असताना देखील उशीर करत असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात येणार आहेत.
कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार उशीर करत आहे. कोर्टाने मागील महिन्यात 15 दिवसांत निवडणुका घ्या असे आदेश दिले होते. याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे कोर्टाचा अवमान झाला असल्याचे प्रशांत जगताप यांचे म्हणणे आहे.
पुण्यात महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यी प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता. तो बदलून शिंदे-फडणवीस सरकारने 4 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. 80 टक्के निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तीन सदस्यीय रचनाही अंतिम झाली आहे. तरी भाजपने आपल्या फायद्यासाठी आता चार सदस्यीय रचना तयार केली आहे. आगामी निवडणुकीसाठीची सगळी कामे झाली असताना हा निर्णय घेऊन उगाच वेळ घालवला जात असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं आहे.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.