loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ११ ऑगस्ट २०२२ !

Aug 11, 2022


मेष :-  खूप दिवसापासून वाट पाहत असाल अशी गोष्ट समोर येईल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलने गरजेचे. गरजूंना मदत होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ :- घरगुती वादात पडू नका. शब्द देताना सावध राहा. बचतीकडे लक्ष द्यावे व अनावश्यक खर्च टाळावेत. नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करावे.

मिथुन :- आपल्यातील सकारात्मक गुणांचा पूर्ण वापर करा निर्णय तुमच्या बाजूने असेल. जेष्टांचा पाठींबा मिळेल. कार्यक्षेत्रात संधीचा लाभ घ्या.

कर्क :- वरिष्ठांची मर्जी राहील. अनपेक्षित बदलांसाठी तयार रहा. मैत्रीत गैरसमज करू नये. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल.

सिंह :- मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या :-  मनातील इच्छा पूर्ण कराल, बोलतांना सांभाळून शब्द वापरा. व्यवसायिकांना लाभदायक दिवस.

तूळ :- आपल्याच मतावर अडून राहू नका, इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात.

वृश्चिक :-  मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

धनू :-  संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर :- लहान आजारांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ :- भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन :- स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
.