loader image
[ays_poll id=7]

माळेगाव कऱ्ह्यात येथे बिबट्याचा वासरांवर हल्ला: ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Aug 12, 2022


शहरापासून जवळच असलेल्या नांदगाव तालुक्यातील माळेगाव कर्यात परिसरात बिबट्याने दोन वासरावर हल्ला केला आहे.याबाबत वनविभागाला कळविण्यात आल्याची माहिती सरपंच देविदास उगले यांनी दिली असून परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शहरापासुन जवळ असलेल्या माळेगाव,नाराययणगाव, घाडगेवाडी परीसरात रात्रीच्या वेळी गल्लीत बिबट्याला वावर करतांना अनेक ग्रामस्थांनी पाहिले असून येथील शिवाजी देवराम चव्हाण व रंजन पांडे यांच्या वाड्यातुन दोन वासरांचा फडशा पाडला असल्याचे ही म्हटले आहे.त्यामूळे या परीसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.या परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याची माहिती माळेगाव कर्यातचे सरपंच उगले यांनी वनविभागाला दिली आहे.या भागात अनेक हिंस्र प्राणी असून या प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.त्या ठिकाणी प्राण्यांचे ठसे मिळून आले आहे.
वनविभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांने घटनास्थळी येऊन हल्ला केलेला प्राणी नेमका कोणता याची माहिती द्यावी म्हणजे ग्रामस्थांमध्ये भीती राहणार नाही. अशी मागणी उगले यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.