loader image
[ays_poll id=7]

६०८ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

Aug 12, 2022

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच सरपंच पदाची सार्वत्रिक निवडणूक अखेर जाहीर झाली असून १८ सप्टेंबर २०२२ रोजी ही निवडणूक होणार असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. थेट जनतेतून यंदा सरपंच निवडले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला.

सुप्रीम कोर्टाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार होतं कमी पाऊस असलेल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा. कोर्टाच्या या आदेशानुसार, सध्या कमी पाऊस असलेल्या राज्यातील ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तसेच निवडणूक काळात या भागात जर अतिवृष्टी किंवा पूरस्थिती झाली तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम असा असेल

१८ ऑगस्ट २०२२ – निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल

२४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ – नामनिर्देशपत्रे दाखल करता येतील

२७, २८, ३१ ऑगस्ट २०२२ – शासकीय सुट्ट्या असल्यानं अर्ज दाखल करता येणार नाहीत

२ सप्टेंबर २०२२ – अर्जांची छाननी होईल

६ सप्टेंबर २०२२ (दुपारी ३ वाजेपर्यंत) – अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत

१८ सप्टेंबर २०२२ – मतदान होईल (स. ७.३० ते सायं. ५.३०)

१९ सप्टेंबर २०२२ – मतमोजणी होईल.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
.