loader image
[ays_poll id=7]

स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त नांदगाव कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Aug 15, 2022

नांदगाव: शहरातील म. वि.प्र.समाजाचे, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संस्मरणीय बनावा यासाठी महाविद्यालयाच्या वतीने व वनविभाग नांदगाव यांच्या सहकार्याने हर घर तिरंगा रॅली आयोजित केली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग ,विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा जागर, तसेच हर घर तिरंगा या योजने अंतर्गत आपणास प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरामध्ये तिरंगा फडकवायचा आहे, या उपक्रमांतर्गत ही रॅली महाविद्यालयापासून ते हुतात्मा स्तंभापर्यंत पार पडली. सदर कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी सहभागी व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले.
या सर्व उपक्रमांचा आढावा विशद करतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस ए मराठे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का साजरा केला जात आहे. यावर प्रकाश टाकला. ‘तिरंगा’ आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम प्रत्येक भारतीयाने त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याची प्रेरणा देते. लोकांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आयोजनामध्ये स्वातंत्र्य लढयाची भावना व त्याग अनुभवता येणार आहे. देशातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली व अभिवादन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. असे सर्व उपक्रम आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहेत. तरी सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी व समाजातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन हे कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य आर.टी.देवरे ,प्रा.आर.एल.दिवटे, प्रा पी.टी.निकम, प्रा.पी.एन.जपे.प्रा.बी.के.पवार,प्रा. फाकटकर,प्रा.पी.एम आहेर,प्रा.पी.के.कुलकर्णी,प्रा.जे. एच.देवरे.प्रा.वडजे,प्रा.जे.एस.शेख,श्रीमती जान्हवी म्हस्के , स्नेहल शेवरे,सुवर्णा लोखंडे, रेश्मा बरकले ,सुषमा पाटील व सर्व महाविद्यालयीन सेवक वर्ग यांनी केले. विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ.अतुल मदने आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी बालाजी मोरे,प्रा. डी.आर. बच्छाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.