loader image
[ays_poll id=7]

अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा

Aug 16, 2022

नाशिक : ७५ वा स्वातंत्र्यादिनाचे अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे ७५ वा स्वातंत्रदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते. नवजात शिशु व बालरॊग विभागा तर्फे रुग्णालयात दाखल बाल रुग्णांसाठी एक संगीत रजनी आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जी बालक आजारपणामुळे त्यांच्या शाळेतील ध्वजारोहनास उपस्थित राहू शकली नाहीत . त्यांनी रुग्णालयातच ७५वा अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करून आनंद लुटला. या विशेष सोहळा निमित्त रुग्णालयाच्या इमारतीस विदुत रोषणाई ने सजवण्यात आले होते.यामुळे परिसर तीन रंगानी उजळून गेला होता.

या सोहळ्यास नवजात शिशु व बालरोग तज्ञ् तथा मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , डॉ नेहा मुखी , डॉ किरण मोटवाणी , डॉ तुषार संकलेचा , केंद्र प्रमुख समीर तुळजापुरकर आणि रुग्णालयातील डॉक्टर , परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.