नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव शहरालगत येवला रस्त्यावरील मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ .
शहरालगत असलेल्या येवला रस्त्यावरील तांदुळवाडी शिवारात दिलीप पारख यांच्या गट नं. ६२ मधील शेतात मका पिका मध्ये अंदाजे ३० वर्ष वय असलेल्या युवकाचा दगडाने ठेचून खुन करून नंतर अर्धवट जाळून टाकलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे
दिलीप पारख यांची शेती कसणारे वाहूदार प्रकाश घुले हे सकाळी शेतात गेले असता त्यांना सदर मृतदेह दिसून आला . त्यांनी त्वरीत नांदगाव पोलिसांना सदर खबर दिली. सदर युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही . घटना स्थळावर डी वाय एस पी समीरसिंग साळवे, पी. आय रामेश्र्वर गाढे हे दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!
नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....











