loader image
[ays_poll id=7]

जळगाव खुर्द ग्रामपंचायतीचा महावितरण ला दणका ; थकबाकी कर वसुलीसाठी दिली नोटीस

Aug 19, 2022


नांदगाव: तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील महावितरण व महापारेषण या दोन कंपन्यांनी व्यवसायासाठी उभारणी केलेले मनोरे,विज रोहित्र,विद्युत खांब यावर सन २००५ पासून मालमत्ता व व्यवसाय कराच्या थकबाकीची वसुली नोटीस संबंधित कंपन्यांना बजावल्याने नांदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांच्या सुचनेवरून महावितरण व महापारेषन या कंपन्यांना मालमत्ता व व्यवसाय कराच्या वसुलीसाठी नोटीस बजावून थकबाकी जमा न केल्यास उच्च न्यायालयाच्या अवमाननेचा दावा दाखल करण्याचा इशारा दिल्याने जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांच्या धडाकेबाज कामाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायत चे सरपंच राजू मगदूम यांनी मागील वर्षी महावितरण च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ३७२४/ २०२१ या क्रमांकाची जनहित याचिका दाखल करत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १२९ अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महावितरण व महापारेषण च्या मालमत्ता वर मालमत्ता व व्यवसाय कर वसुल करण्याचा आदेश मिळविला होता.
याबाबत जळगाव खुर्द ग्रामपंचायत चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच राजू मगदूम तसेच मुंबई उच्च न्यायालयात वारंवार पाठपुरावा करून या संदर्भात सर्व आदेश प्राप्त केले व नियमानुसार महावितरण चे नांदगाव उपविभागीय कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता यांना संयुक्त मालमत्ता मोजणी कामी महावितरण चा प्रतिनिधी देण्याची विनंती केली.मात्र निर्धारित कालावधी उलटूनही महावितरण ने आपला प्रतिनिधी संयुक्त मालमत्ता मोजणी साठी न दिल्याने उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महावितरण व महापारेषण या कंपन्यांनी व्यवसायासाठी उभे केलेले मनोरे,विज रोहित्र,विद्युत खांब यांची मोजदाद करून शासन नियम तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १२९अन्वये आकारणी करत सन २००५ /२००६ते सन २०२१/२०२१पर्यंत ची थकबाकी म्हणून महावितरण कंपनीने रुपये ७५९१३१९ I-तसेच महापारेषण कंपनीने रुपये ३०५१६७० ।- चा थकबाकीचा भरणा तातडीने सरपंच ग्रामपंचायत जळगाव खुर्द ता.नांदगाव या नावाने धनाकर्ष,धनादेश द्वारे जमा करावा अन्यथा माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली म्हणून महावितरण व महापारेषण यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानानेचा दावा दाखल करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला आहे.
या घटनेमुळे नांदगाव तालुक्यात खळबळ उडाली असून तालुक्यातील सर्व सरपंच व नागरिक जळगाव खुर्द चे उपसरपंच यशवंतराव जाधव यांच्या अभ्यासू व धाडसी वृत्तीचे कौतुक करत आहेत.
यासंदर्भात उपसरपंच यशवंतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले कि,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १२९ नुसार आपल्या कार्यक्षेत्रातील मालमत्तांवर मालमत्ता व व्यवसाय कर आकारणीचा अधिकार ग्रामपंचायतींना घटनेने दिला असून माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.३७२४ /२०२१ मध्ये ग्रामपंचायत माणगाव विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या याचिकेचा निकाल देताना महावितरण व महापारेषण च्या मालमत्तांवर मालमत्ता व व्यवसाय कर वसुली करण्याचा अधिकार शिक्कमोर्तब केला आहे.
मात्र या आदेशाच्या अंमलबजावणी करताना महावितरण किंवा महापारेषण ने टाळाटाळ केल्यास या दोन्ही कंपन्यांवर उच्च न्यायालयाच्या अवमानानेच दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.