loader image
[ays_poll id=7]

मनमाड फोटोग्राफर युनियन कडुन जागतिक छायाचित्र दिन साजरा

Aug 19, 2022


मनमाड : हजार शब्दात जे सांगता येत नाही त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगु शकते. आज जागतिक छायाचित्र दिन ,सन 1839 मध्ये फोटोग्राफी ची सुरवात झाली.19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रेंच सरकारने पेटंट विकत घेतले आणि या अविष्काराला संपुर्ण जगात मान्यता दिली. म्हणूनच 19 ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनाच्या रूपात साजरा करतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रूपात कैद केले आणि त्यांना नेहेमी आठवणीत ठेवले.

आज ‘मनमाड फोटोग्राफी युनियन’ कडुन जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात आला. युनियनच्या सर्व सदस्यांनी छायाचित्र दिना निमित्ताने आपला सोबती असणारा कॅमेऱ्याचे पुजन कृतज्ञता व्यक्त केली .या प्रसंगी मनमाड फोटोग्राफी युनियनचे जेष्ठ सदस्य श्री नरेंद्र भावसार , श्री महेश दारुंटे , श्री नंदू भुजाडे , श्री संजय निकम , श्री लक्ष्मण काळे , श्री संजय घुमरे , श्री प्रेम सुर्यवंशी , श्री केतन जाधव , श्री दत्तु तळेकर , श्री कादिर शेख , श्री योगेश देशपांडे , श्री गणेश संसारे , श्री विशाल गोसावी , श्री भावेश उबाळे , श्री प्रवीण जगताप , श्री संतोष धोंडगे , श्री योगेश म्हस्के आदी सदस्य उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.