loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २० ऑगस्ट २०२२ !

Aug 20, 2022


मेष :-  रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केंद्रित करावे.

वृषभ :- व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

मिथुन :- आपल्या कामात हुशारी दाखवावी. काही चांगले बदल अनुभवास येतील. 

कर्क :- जुने आजार दुर्लक्षित करू नका. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. 

सिंह :- स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. छुप्या शत्रूपासून सावध रहावे.

कन्या :- गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.

तूळ :-  नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. 

वृश्चिक :- भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. 

धनू :-  नवीन शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल.

मकर :- नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका.

कुंभ :- जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. 

मीन :- जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. 


अजून बातम्या वाचा..

.