Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोफत आधार कार्ड व मतदान कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन

Aug 20, 2022

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोनदिवसीय मोफत आधार कार्ड व मतदान कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.20 व रविवार दि.21 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत डी.एम.ऑनलाइन सर्विसेस, सानप कॉम्प्लेक्स, नामको बँक खाली, मनमाड येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनमाड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवार दि.२० रोजी शिबिराचा प्रारंभ करण्यात आला, यावेळी कार्याध्यक्ष नाना शिंदे, हबीब शेख, अक्षय देशमुख, कोमल निकाळे, जावेद शेख, पवन आहिरे, आनंद बोथरा, प्रतिक मोरे, सुरेश वाघ, डि.एम.सव्हिसेस चे दिपक मकवाने आदि उपस्थित होते. शिबिरात १३७ नागरिकांनी सहभाग नोंदवला.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]