loader image
[ays_poll id=7]

पिंपरखेड येथील कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात दहीहंडी उत्सव साजरा.

Aug 21, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) :तालुक्यातील पिंपरखेड येथील विद्यालयात आज गोपाळ काला निमित्ताने दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी विद्यालयाच्या प्रांगणात सजवलेल्या दहीहंडीची उभारणी करण्यात आली होती. राधाकृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. इ. ५ वी ते १० वीच्या मुला मुलींनी अतिशय कौशल्याने अनेक थर उभारून दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सर्व मुला मुलींचा व अनेक पालकांचा, ग्रामस्थांचा सहभाग लक्षणीय होता.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. गवळी के. एम. यांचे मार्गदर्शन लाभले तर जेष्ठ शिक्षक श्री. बोरसे सर, श्रीमती शिंदे मॅडम, श्री. पठाडे सर, श्री. जाधव सर, श्री. सोनवणे सर, श्री. मवाळ भाऊसाहेब, श्री. चव्हाण सर, श्री. आबा सोनवणे, उमेश देशमुख आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. तर या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर, नीटनेटके संयोजन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्री. संजय कांदळकर सर यांनी केले.
दहीकाल्याचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.