loader image
[ays_poll id=7]

आ. सुहास कांदे यांचा निर्धार ; नांदगाव तालुक्यात लवकरच लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक निर्माण करणार

Aug 22, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : शहरात धनगर (मेंढपाळ ) समाज निर्धार मेळाव्यात आ. कांदे यांनी धनगर समाज बांधवांशी संवाद साधला .
दऱ्या – खोऱ्यात भटकंती करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांच्या मेंढीचराई, आरक्षण तसेच इतरही ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे असे प्रतिपादन आ. कांदे यांनी केले.

ते रविवारी धनगर ( मेंढपाळ ) समाज निर्धार मेळाव्याप्रसंगी बोलत होते..व्यासपीठावर केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांचे स्विय सहाय्यक उमेश काळे, मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे, नगराध्यक्ष राजेश कवडे, किरण देवरे, मल्हार सेना महिला अध्यक्षा रंजना बोरसे, जिल्हाध्यक्ष राजेश शिंदे, भगवान कोळेकर, रंगनाथ खरात, शिवाजी काटकर, प्रदिपराज भोंडे, अमोल नावंदर, गणेश शिंदे, राजेंद्र शिंदे, किरण देवरे, कारभारी शिंदे, माधवराव जाधव, गणेश गायकवाड, नंदू खरात, दिनकर खडांगळे आदी उपस्थित होते..ते पुढे म्हणाले की, १५ ते २० वर्षांपासून नांदगाव शहरात अहिल्या देवी होळकर यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी आहे, मात्र शासन स्तरावर रीतसर परवानगी घेवून केवळ पुतळा नव्हे तर अहिल्या देवी होळकर यांचे स्मारक उभारण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे..मेंढपाळ बांधवांचे अनेक प्रश्न आहेत.मेंढीचराई, वनजमिनीचे प्रश्न, मेंढपाळ बांधवांच्या शिक्षणासाठी वस्तीगृह उभारण्यात यावे, तसेच मेंढपाळ बांधवावरील गुन्हे आदी महत्वाचे प्रश्न आहेत..या सर्व प्रश्नांचा शासन स्तरावर प्रयत्न करून निपटारा करणार असल्याचे आ.कांदे यांनी शेवटी सांगितले..मेंढ्या चारण्यासाठी वनविभागाचे नियम पाळून ज्या वनविभागात जागा आहे तेथे मेंढ्या चारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून मेंढपाळ बांधवांच्या कुठल्याही समस्या असल्यास मला दूरध्वनी करून कळवा तातडीने त्या सोडविल्या जातील असे आश्वासन आ.कांदे यांनी शेवटी दिले..
केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांच्या माध्यमातून धनगर ( मेंढपाळ ) समाज बांधवांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री भारती पवार व आमदार सुहास कांदे हे कटिबध्द राहतील अशी ग्वाही स्विय सहाय्यक डॉ.उमेश काळे यांनी यावेळी दिले.मल्हार सेनेचे लहुजी शेवाळे यांनी आपल्या मनोगतातून मेंढपाळ बांधवांच्या समस्या विषद केल्या. मेंढपाळ यांच्या अनेक समस्या महाराष्ट्रात आहेत, पिढ्यान् पिढ्या ते भोगत आहे मात्र त्यांच्या समस्या सुटत नाही, अनेक सरकार येतात, मंत्री होतात, आमदार खासदार, येतात क्षणिक समस्या सोडवितात.कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी समाजाचे नेतृत्व स्वीकारून आमचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी त्यांनी केली..ते म्हणाले की, धनगर समाजाला राज्य घटनेतील तरतुदीनुसार अनु.जमातीचे आरक्षण लागू करण्याकरीता शासन स्तरावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, मेंढीचराई करिता वनक्षेत्र उपलब्ध व्हावे, महाराष्ट्रातील मेंढपाळावरील दाखल केसेस शासनातर्फे काढून घेण्यात याव्या, नांदगाव शहरातील लोकमाता अहिल्या देवी यांचा पुतळा बसविण्यात यावा आदी मागण्या आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केल्या..धनगर समाज मेळाव्यातील सर्व उपस्थित मान्यवरांचा यावेळी धनगरी घोंगडी देवून स्वागत करण्यात आले..मेळावा यशस्वितेसाठी मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश शिंदे, भगवान कोळेकर, रंगनाथ खरात,
व धनगर समाज बांधवांनी परिश्रम घेतले…


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.