loader image
[ays_poll id=7]

नांदगाव महाविद्यालयात ‘सर्प’ समज-गैरसमज यावर व्याख्यान संपन्न

Aug 22, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाने ) : नांदगाव महाविद्यालयात ‘सर्प’ समज-गैरसमज यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्पमित्र तसेच एन.एस.एस.यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान संपन्न झाले.

साधा साप दिसला की तो मारायचा हे सर्व सामान्य लोकांच्या मनावर बिंबले गेले आहे साप म्हणजे शत्रू हीच शिकवण पिढ्यानपिढ्या मिळत केली साप ही समाज मानवी अप्रचाराने बदनाम झाला आहे विषारी आणि बिनविषारी साप कोणता हे ओळखताना आल्याने माणूस घाबरतो त्याच्या या अज्ञानामुळे सापाला मारले जाते सापाच्या जाती न ओळखता आल्यामुळे अनेक सापांचा जीव जातो तेव्हा हे थांबविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन नांदगाव तालुका आणि सर्पमित्र नांदगाव तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव च्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नांदगाव महाविद्यालयात सर्पाची ओळख आणि समज गैरसमज डिजिटल चित्रफिती द्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा उपक्रम घेण्यात आला.

सर्पतज्ञ सुशांत रणशूर यांनी विद्यार्थ्यांना सुंदर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस.एन.शिंदे कासार साहेब ,वन विभाग,आर.एफ.ओ नांदगाव, उपप्राचार्य एस.ए.मराठे, सुनील महाले वन परिमंडळ, डॉ.सौ.ख्याती तुसे,ग्रासित रुग्णालय, नांदगाव, प्रभाकर निकुंभ, वन्यजीव संरक्षण, बहुउद्देशीय संस्था, नांदगाव, तालुका, सुरेश नारायणे अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदगाव तालुका सर्पमित्र अमोल सोनवणे,प्रमोद महानुभाव,मंगेश चारोस्कर, मंगेश आहेर, पंकज शर्मा, संदिप जाधव, महेश आहेर,पवन झाडगे,वैभव गायकवाड,सागर विसपुते,मयुर बागुल एन.एस.एस.प्रमुख प्रा.बालाजी मोरे, डॉ.अतुल मदने आदी उपस्थित होते.
साप हा शेतकऱ्यांचा जसा मित्र आहे तसा तो मानवाचा देखिल मित्र आहे.कारण अनेक औषधात सर्पाचे विष वापरले जाते.अंगदुखी, कॅन्सर,भूल आदी इंजेक्शन मध्ये वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
धामण,गवत्या,तस्कर,अजगर,मांडुळ,दिवड, पट्टेरी,पानसर्प,कुकरी हे साप बिनविषारी आहेत तर मण्यार घैणस,फुरसे,नाग हे अतिविषारी साप आहे.हे सर्व साप कसे ओळखाल या बाबतची माहिती रणशूर यांनी विद्यार्थ्यांना दिली शिवाय साप चावल्यास अंगारे-धुपारे किंवा तांत्रिक- मांत्रिक यांच्याकडे न जाता जवळच्या सरकारी रुग्णालयात त्या रुग्णाला दाखल करण्याची त्यांनी सूचना दिली. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होते असे रणशुर म्हणाले. तसेच प्राथमिक स्वरुपात कोणती काळजी घ्यावी ही माहिती दिली प्रात्यक्षिके द्वारे विद्यार्थ्यांना दिली. यावेळी डॉ.सौ.ख्याती तुसे व प्रा. सुरेश नारायणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बालाजी मोरे व डॉ.अतुल मदने यांनी केले. सूत्रसंचालन के.टी.बागुल यांनी केले तर आभार प्रा.एस.पी. दौंड व प्रा. पी. एम. अहिरे यांनी मानले कार्यक्रम सिनियर व ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांना स्वतंत्र वेळेत दोन सत्रात घेण्यात आला. व सापा विषयी विद्यार्थ्यांचे समज व गैरसमज दूर करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.