loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : २३ ऑगस्ट २०२२ !

Aug 23, 2022


  1. मेष : वाद घालू नका. कोणत्याही कामाचा प्रारंभ करू शकता. मध्यान्हानंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहिल. प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवू शकता.
  2. वृषभ : दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक जीवनशैलीत सुख मिळेल. कामात यश मिळेल. खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे.
  3. मिथुन : मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. मन अस्थिर असेल. खर्च वाढेल. कामात अडथळे येतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल.
  4. कर्क : आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाईट विचार तुमच्या मनासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक स्थिती ढासळेल. रात्रीच्या मध्यान्हानंतर शारीरिक रुपातून मनात प्रसन्नता राहिल. धन लाभ होईल आणि कामा-धंद्यात यश मिळेल. मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. 
  5. सिंह : धन लाभ होईल. शुभवार्ता मिळेल. मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. कुटुंबात आनंदमय वातावरण राहील. धावपळीच्या जीवनात मान-सन्मान मिळेल. 
  6. कन्या : कुटुंबातील वातावरण आनंदमय असेल. घरात स्वच्छता ठेवल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल. आरोग्य चांगले राहील. मनात शांती ठेवा, त्यामुळे तुम्हांला स्फूर्ती मिळेल. 
  7. तूळ : दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कामात अनुकूल परिस्थिती राहिल. शारीरिक रूपातून मन आनंदीत राहिल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. खर्च वाढेल त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. 
  8. वृश्चिक : कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. खर्च वाढेल. मनावर स्थिरता ठेवा. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.  मित्रपरिवारांच्या झालेल्या भेटीमुळे मन प्रसन्न राहिल.
  9. धनु : दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. मन स्थिर ठेवल्यामुळे, आरोग्य चांगले राहिल. वाद घालणे टाळा, जेणेकरून तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. पैशांच्या बाबतीत लक्ष्य ठेवणं गरजेचे आहे.
  10. मकर : नकारात्मक विचार करू नका. वाईट गोष्टींमुळे मन अस्थिर राहिल. कौटुंबिक वातावरणात परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी शिकण्यावर भर द्या.  कोणत्याही कामाची सुरूवात करू शकता. परिवारांसोबत चांगला वेळ घालवाल.
  11. कुंभ : तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. भाऊ-बहिणीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहिल. धनप्राप्ती होऊ शकते. जीवनात अपयश येईल आणि अधिक खर्च देखील वाढेल.
  12. मीन : आसपासच्या व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. मन प्रसन्न ठेवा.काही कारणास्तव आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वैचारिक चर्चेमुळे तुम्हांला आनंद मिळू शकतो.

अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.