loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी विश्वास पाठक

Aug 23, 2022

मुंबई/नाशिक, दि. २३ऑगस्ट २०२२:- ऊर्जा खात्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले श्री विश्वास पाठक यांची महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी अंतर्गत असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांवर स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक झाली आहे.

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीच्या मुख्यालयात श्री पाठक यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२० या कार्यकाळात याच पदाचा पदभार सांभाळला असून या काळात त्यांनी वीज निर्मितीची स्थापित क्षमतावाढ, भारनियमन मुक्त महाराष्ट्र यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी ऊर्जा विभागाला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.२०१४-२०१९ या युती सरकारच्या काळात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऊर्जा विभागासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. तसेच त्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत प्रत्येक जिल्हास्थानी ऊर्जा विभागाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचाव्या म्हणून पत्रपरिषदा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला आहे. यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पत्रकारांशी त्यांचा जनसंपर्क आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये आतापर्यंत त्यांचे चारशेवर लेख प्रसिध्द झाले आहेत.

श्री. पाठक हे वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवीधर आहेत आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे फेलो सदस्य तसेच कायद्यातील पदवीधर आहेत. त्यांना कायदा, व्यवस्थापन, वित्त, कॉर्पोरेट कायदा आणि उद्योग क्षेत्रातील २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी कॉर्पोरेट कायद्यात मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणूनही सराव केला आहे. श्री. पाठक हे स्वतंत्र संचालक म्हणून विविध सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रासाठी व्हिजन डॉक्युमेंट कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.