loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २६ ऑगस्ट २०२२ !

Aug 26, 2022


मेष :- तुमचा मान वाढेल. हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील.

वृषभ :- आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. चिंतन करण्यात वेळ घालवाल.

मिथुन :- कागदपत्रे जपून ठेवावीत. घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी.

कर्क :- दिवस स्व‍च्छंदीपणे घालवाल. अतिविचार करू नये. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल.

सिंह :- छुप्या शत्रूंवर जय मिळवता येईल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील.

कन्या :- जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करावा. स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. पैशाचा योग्य विनिमय करावा.

तूळ :- हातात नवीन अधिकार येतील. पराक्रमाला अधिक बळ मिळेल.

वृश्चिक :- दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

धनू :- व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल. चातुर्याने व्यवहार कराल.

मकर :- कामात तत्परता दाखवाल. सर्व गोष्टी उत्तमरीत्या जाणून घ्याल.

कुंभ :- शांत व स्थिर विचार करावा. आवक-जावक यांचा मेळ घालावा. अनाठायी खर्च टाळावा.

मीन :- चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल.


अजून बातम्या वाचा..

.