Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील रेल्वे गेट बंद करून तयार केलेला सब-वे ‘कबाब मे हड्डी’

Aug 26, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहरातील रेल्वेगेट बंद करून तयार केलेला सब वे नागरिकासाठी आणि वाहतुकदारांसाठी ‘कबाब मे हड्डी’ बनला आहे. केवळ गेट बंद करावयाचे म्हणून घिसाडघाईने तयार केलेला आराखडा सुरवातीपासून वादात सापडला. सब वे च्या वाहतूक क्षमतेविषयी वेळोवेळी नांदगावकरांनी आवाज उठवला. भविष्यातली वाहतूक व तिची वाढ लक्षात न घेता रेल्वे प्रशासनाने तो शहरवासीयांवर थोपवला. पावसाळा असो की इतर ऋतू कायमच तो वाहतुकीच्या घशातला शुक्राचार्य ठरला आहे.दि २५ रोजी दिवसातून पाचवेळा सबवेची वाहतुन ठप्प झाली अशा वेळेला मोठी समस्या निर्माण झाली होती .येथे वाहतूक पोलिसाची त्वरीत नेमणूक करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे हे मोठे अपयश म्हणावे की आले त्यांच्या मना….तिथे कोणाचे काही चालेना असे झाले आहे. सब वे हि ऑल सिझन कायमस्वरूपी डोकेदुखी झाली आहे. सब वे झाला त्याच वर्षी सब वे पुराच्या पाण्यात बुडाला. सब वे तून घुसलेले पाणी रस्त्यावर आले आणि रस्त्यालगतच्या इमारतीतले पहिले मजले घरे, दुकाने पाण्यात बुडाले. कोटींचे नुकसान झाले. तसेच १ महिना सदर सब वे वाहतुकीला बंद होता .त्यानंतर सब वेच्या आराखड्यावर आक्षेप घेण्यात आले. तेव्हा रेल्वे अभियंते यांनी मटन मार्केट तोडले तर मार्ग काढू असे सांगितले. लोकांच्या विरोधात नगरपरिषदेने स्वत: बांधलेल्या मार्केटवर हातोडा चालवून ते तोडले.
गुरुवार दि. २५ ऑगष्ट रोजी पाऊस नव्हता तरी कोंडी झाली. अशी कोंडी तर दररोज अनेकदा होते. सब वे वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने निनादत असतो. कोंडी झालेली वाहने क्यांव क्यांव करत आपला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतानाचे दृश्य खूप त्रास देणारे असते. हे बघायला रेल्वेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी कोणीच नसतात. पण मुकी बिचारी जनता कुणी हि हाका या न्यायाखाली दडपली गेल्याने आपली वाट शोधतांना धडपडत असते . दररोज सरासरी एखादा तरी नागरिक धडपडतो आणी अत्यंत कडवट प्रतिक्रिया देत पुढे सरकतो. एकीकडे केंद्र सरकार भविष्यातली आवाहने डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पांची आखणी करत असतांना रेल्वेच्या ‘गेट बंद प्रकल्पा’ ने मात्र शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचे भविष्य अंधारमय केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या लेकीला न्याय मिळावा : दोषींवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मूक मोर्चा द्वारे केली मागणी

मनमाडच्या लेकीला न्याय मिळावा : दोषींवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मूक मोर्चा द्वारे केली मागणी

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात मनमाड ची कन्या आरती दाभाडे (सोनवणे) हीचा वैजापूर येथे सासरच्यांकडे...

read more
कर्मचाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची:संचालक डॉ. नरेश गिते; एकलहरे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे भेट 

कर्मचाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची:संचालक डॉ. नरेश गिते; एकलहरे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे भेट 

ऊर्जा क्षेत्रात  येणारे नवनवीन तंत्रज्ञान व माहिती,  महावितरण कंपनी समोरील आव्हाने व उपाय तसेच...

read more
कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा तर्फे अभिवादन

कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा तर्फे अभिवादन

ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी प्रमुख...

read more
राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न

राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न

आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची 392 जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]