Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील रेल्वे गेट बंद करून तयार केलेला सब-वे ‘कबाब मे हड्डी’

Aug 26, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहरातील रेल्वेगेट बंद करून तयार केलेला सब वे नागरिकासाठी आणि वाहतुकदारांसाठी ‘कबाब मे हड्डी’ बनला आहे. केवळ गेट बंद करावयाचे म्हणून घिसाडघाईने तयार केलेला आराखडा सुरवातीपासून वादात सापडला. सब वे च्या वाहतूक क्षमतेविषयी वेळोवेळी नांदगावकरांनी आवाज उठवला. भविष्यातली वाहतूक व तिची वाढ लक्षात न घेता रेल्वे प्रशासनाने तो शहरवासीयांवर थोपवला. पावसाळा असो की इतर ऋतू कायमच तो वाहतुकीच्या घशातला शुक्राचार्य ठरला आहे.दि २५ रोजी दिवसातून पाचवेळा सबवेची वाहतुन ठप्प झाली अशा वेळेला मोठी समस्या निर्माण झाली होती .येथे वाहतूक पोलिसाची त्वरीत नेमणूक करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे हे मोठे अपयश म्हणावे की आले त्यांच्या मना….तिथे कोणाचे काही चालेना असे झाले आहे. सब वे हि ऑल सिझन कायमस्वरूपी डोकेदुखी झाली आहे. सब वे झाला त्याच वर्षी सब वे पुराच्या पाण्यात बुडाला. सब वे तून घुसलेले पाणी रस्त्यावर आले आणि रस्त्यालगतच्या इमारतीतले पहिले मजले घरे, दुकाने पाण्यात बुडाले. कोटींचे नुकसान झाले. तसेच १ महिना सदर सब वे वाहतुकीला बंद होता .त्यानंतर सब वेच्या आराखड्यावर आक्षेप घेण्यात आले. तेव्हा रेल्वे अभियंते यांनी मटन मार्केट तोडले तर मार्ग काढू असे सांगितले. लोकांच्या विरोधात नगरपरिषदेने स्वत: बांधलेल्या मार्केटवर हातोडा चालवून ते तोडले.
गुरुवार दि. २५ ऑगष्ट रोजी पाऊस नव्हता तरी कोंडी झाली. अशी कोंडी तर दररोज अनेकदा होते. सब वे वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने निनादत असतो. कोंडी झालेली वाहने क्यांव क्यांव करत आपला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतानाचे दृश्य खूप त्रास देणारे असते. हे बघायला रेल्वेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी कोणीच नसतात. पण मुकी बिचारी जनता कुणी हि हाका या न्यायाखाली दडपली गेल्याने आपली वाट शोधतांना धडपडत असते . दररोज सरासरी एखादा तरी नागरिक धडपडतो आणी अत्यंत कडवट प्रतिक्रिया देत पुढे सरकतो. एकीकडे केंद्र सरकार भविष्यातली आवाहने डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पांची आखणी करत असतांना रेल्वेच्या ‘गेट बंद प्रकल्पा’ ने मात्र शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचे भविष्य अंधारमय केले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न...

read more
मनमाड शहर भाजपा व्यापारी आघाडी तर्फे मालमत्ता कर व पाणी पट्टी कर आकारणी वरील व्याज माफ करण्याची मागणी

मनमाड शहर भाजपा व्यापारी आघाडी तर्फे मालमत्ता कर व पाणी पट्टी कर आकारणी वरील व्याज माफ करण्याची मागणी

मार्च 2020 ते मार्च 2022 या चोवीस महिन्याच्या कालावधीत संपूर्ण देशात कोरोना संकट आले त्याला मनमाड...

read more
हाडबीची शेंडी गिर्यारोहक दुर्घटना – पर्यटन संचालनालयाने घेतली दखल, इंद्रप्रस्थ ट्रेकर्सला बजावली नोटीस

हाडबीची शेंडी गिर्यारोहक दुर्घटना – पर्यटन संचालनालयाने घेतली दखल, इंद्रप्रस्थ ट्रेकर्सला बजावली नोटीस

मनमाड शहराजवळील हाडबिची शेंडी या सुळक्यावर २ फेब्रुवारी रोजी अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स...

read more
जलसंवर्धन आणि श्रमसंस्काराचे महत्त्व समजलेल्या  मनमाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष  श्रमसंस्कार शिबीर संपन्न

जलसंवर्धन आणि श्रमसंस्काराचे महत्त्व समजलेल्या मनमाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड या महाविद्यालयाचे...

read more
येवल्याचे माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, भाजपचे माजी नगरसेवक सुनील काबरा यांसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

येवल्याचे माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, भाजपचे माजी नगरसेवक सुनील काबरा यांसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आज येवला येथील संपर्क कार्यालयात राज्याचे अन्न ,नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]