Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – गोदावरीचा राजा गणेशाची स्थापना

Aug 31, 2022

मनमाड सीएसटी सुपरफास्ट एक्स्प्रेस मध्ये आज मनमाड येथून गणपत्ती बाप्पा विराजमान झाले आहे. गेल्या २५ वर्षा पासून मनमाड येथून सुटणा-या गोदावरी एक्सप्रेस मध्ये श्रीगणेशाची स्थापना करण्यात येते. ती आजही कायम आहे. मनमाडहून नाशिक प्रवास करणारे चाकरमाने धावत्या एक्सप्रेस मध्ये हा गणेशोत्सव साजरा करतात. आज सकाळी आरती झाल्यानंतर सर्व चाकरमान्यांनी नाचण्याचा आनंद घेतला आणि गोदावरी एक्सप्रेस आपल्या पुढच्या प्रवासाला निघाली आणि त्याच बरोबर गणपती बाप्पा दहा दिवसाचा प्रवास सुरु झाला. धावत्या ट्रेन मध्ये गणेशाची होणारी स्थापना हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असतो. या गणेशोत्सवात पासधारकांची बोगी अत्यंत आकर्षक सजावट करुन विविध सामाजिक संदेशाचे फलक गाडीत लावण्या आले. कोरोनाच्या दोन वर्षाचा कालखंडात ट्रेन बंद जरी असली तरी रेल्वे वर्कश़ॉप मध्ये असलेल्या गाडीच्या ऐका बोगीत बाप्पाची स्थापना होत होती. यंदा गाडी सुरु झाली कोरोनाचे संकट कमी झाल्याने पुन्हा त्याच उत्साहात या ट्रेन मध्ये दहा दिवसांसाठी गणपती विराजमान झाले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड नगरपरिषद व पंचायत समिती, नांदगाव यांचेमार्फत संयुक्तिक फिरत्या वाहनाद्वारे कोविड लसीकरण मोहिम

मनमाड नगरपरिषद व पंचायत समिती, नांदगाव यांचेमार्फत संयुक्तिक फिरत्या वाहनाद्वारे कोविड लसीकरण मोहिम

मनमाड नगरपरिषद व पंचायत समिती, नांदगाव यांचेमार्फत संयुक्तिक पणे संपूर्ण शहरात फिरत्या वाहनाद्वारे...

read more
म.सा. शिवजयंती उसत्व समिती तर्फे HAK हायस्कुल, ईकरा उर्दू गल्स हायस्कुल व शहेजादि इंग्लिश मेडीयम स्कूल येथे निबंधस्पर्धेचे पारितोषिकांचे वितरण

म.सा. शिवजयंती उसत्व समिती तर्फे HAK हायस्कुल, ईकरा उर्दू गल्स हायस्कुल व शहेजादि इंग्लिश मेडीयम स्कूल येथे निबंधस्पर्धेचे पारितोषिकांचे वितरण

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनमाड शहरात सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे शहरात विविध...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]