आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघातील जनतेसाठी दोन ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्या असून त्यांचे लोकार्पण आज करण्यात आले.
सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वखर्चातून दोन ॲम्बुलन्स मतदारसंघातील जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सांगितले.
आज नांदगाव येथील निवासस्थानी या दोन्ही ॲम्बुलन्सचे फित कापून कांदे कुटुंबीयांनी लोकार्पण केले.
याप्रसंगी फरहान खान,प्रमोद भाबड, किरण देवरे,अमोल नावंदर, बाळू आप्पा कांदे,ज्ञानेश्वर कांदे,सागर हिरे, अनिल तात्या रिंडे,रफिक शेख,राहुल तूसे,सौ.रोहिणी मोरे, अजिज शेख, आय्याज शेख,भाऊराव बागुल, अण्णा मुंडे ,कपिल तेलोरे, वाल्मीक बागुल आदि सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड चे महत्वपूर्ण गौरवास्पद योगदान देव,धर्म आणि राष्ट्र कार्याची स्वप्न पूर्ती ➖नितीन पांडे
मनमाड - सोमवार 22 जानेवारी 2024 (पौष शुद्ध द्वादशी )विश्वा तील सर्व हिंदू बांधवान साठी ऐतिहासिक...











