नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : कळमदरी येथील मुख्याध्यापक सुरेश उत्तम बागूल यांच्या विरोधात दि १ व २ सप्टेंबर या दोन दिवस सुरू असलेले आमरण उपोषण मुख्यध्यापकाच्या निलंबनाच्या लेखी प्रस्तावा नंतर मागे घेण्यात आले . यावेळी मुख्यध्यापका विरोधात घोषणा देण्यात आल्या अनेक तरुण या उपोषणात सामील झाले होते. गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी लेखी प्रस्तावाची प्रत ग्रामस्थांना व शालेय शिक्षण समितीला दिली.
गुरुजी(मुख्याध्यापक) शाळेवर नियमित उपस्थीत राहत नाही, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व शालेय गणवेश यांचे वेळेत वाटप होत नाही ?.या संदर्भात नांदगांव जि प शिक्षण विभाग तथा गटविकास अधिकारी यांनी सदर मुख्यध्यापक कळमदरी ता .नांदगांव यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून देखील त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही .त्यामुळे शालेय शिक्षण समिती व ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत सदर मुख्याध्यापक सुरेश उत्तंम बागुल यांच्यावर जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तनुक) नियम १९६७ चे नियम ३ चा भंग करीत असल्याचे स्थानिक तालुका प्रशासनाच्या निर्दशनास आले तसेच कळमदरी गावातील ग्रामस्थांचा लोकक्षोभ असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे पत्र नाशिक शिक्षण प्राथमिक विभाग यांना लेखी पाठविले त्याची प्रत स्थानिक ग्रामस्थ व ग्राम शिक्षण समिती यांना देण्यात आली तसेच संबधित मुख्यध्यापकाच्या कारनाम्याचे वृत्त देखील प्रसिध्द झाले होते . या सर्वांची दखल घेत स्थानिक प्रशासनाने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठविला आहे .दरम्यान सदर शिक्षका वर शाळेत वेळेवर न येणे,शाळेत झोपा काढणे, विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पोषण आहार वेळेत न देणे असे आरोप करण्यात आले होते त्यासंबधीत चे लेखी तोंडी स्थानिक प्रशासनाला देखील कळविले होते स्थानिक प्रशासनाने सदर मुख्यध्यापकाला कारणे दाखवा नोटीस पाठवून देखील त्यांच्या शालेय कामकाजात सुधारणा न झाल्याने नागरिकांनी दि १ रोजी कळमधरी शाळेला टाळे लाऊन तिव्र आदोलन छेडले होते. त्याची दखल घेत संबधीतावर निलंबनाचा प्रस्ताव ग्रामस्थांना सादर केल्या नंतर शाळेचे टाळे उघडण्यात आले या बाबत गटविकास अधिकारी गणेश चौधरी,व प्र.ग. शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी स्थानिक गावात जाऊन कळमदरी नागरिकांना लेखी पत्र देण्यात आले .आता मुख्यध्यापकाच्या निलंबनाच्या कारवाईकडे ग्रामस्थाचे लक्ष लागले आहे.सुरुवातीला मुख्यध्यापकाची बदलीची मागणी केली होती पण त्यास न जुमानल्याने निलंबनाची मागणी केली आहे अशाच घटनावरुन आमदार प्रशांत बंग यांनी विधान सभेत आवाज उडवून शिक्षकांना पाठीशी घालणाऱ्या पदवीधर आमदरांवर टीका करीत ७०% शिक्षक मुख्यालयात राहत नसल्याने शाळेवर होणारे परिणामांची कारणमिमांसा केली आहे या वरुन शिक्षक व आ. प्रशांत बंग यांच्यात जुंपली आहे .
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











