loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहराला होणाऱ्या अशुध्द पाणी पुरवठा विरोधात संतोष गुप्ता यांचे नगरपालिकेस निवेदन

Sep 4, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहराला शुध्द पाणी पुरवठा व रोटेशन पाच दिवसाआड करावे या मागणी साठी शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख श्री संतोष गुप्ता यांचे नगरपरिषदेला निवेदन .
नांदगाव तालुक्यात उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गिरणाडॅम धरण आहे .या धरणातून शहराला नळपाणी पुरवठा योजना आहे. परंतू येथील पाणीपुरवठा योजना नेहमीच काहीना काही कारणाने बंद असते . नांदगाव न. पा च्या मालकीचे दहेगाव धरण आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून माणिकपुंज धरणा वरून पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत होती परंतू ति तांत्रीक दृष्टया खर्चीक असल्याने ती सद्या तरी बंद आहे .सद्य स्थितीत दहेगाव धरणातून पाणी येत आहे परंतु न. पा कडे स्वताची पाणी शुध्द करण्याची कोणत्याही योजना नाही. त्यामुळे या पाण्यात टी. सी. एल .पाऊडर व तुरटी टाकून पाणी शुध्द करण्याचा प्रयत्न केला जातो . पण दहेगाव धरणातून येणाऱ्या पाण्यात मोठया प्रमाणात गाळ असून अळया सुध्दा असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात साथीचे आजाराने नागरीक त्रस्त झाले आहे. दवाखान्यामध्ये आजारी पेशंटची संख्या वाढत आहे.
सद्या सणासुदीचे दिवस असल्याने न. पा ने शुध्द पाणीपुरवठा करावा व रोटेशन ५ ते ६ दिवसा वर आणावे अशी मागणी संतोष गुप्ता यांनी निवेदना द्वारे केली आहे.


अजून बातम्या वाचा..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा तर्फे मंदिर स्वछता अभियान व महाआरती कार्यक्रम

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव ( 300 वी जयंती )निमित्ताने...

read more
.