loader image
[ays_poll id=7]

कविता निसर्गदत्त असली तरी तिला पैलू पाडावेच लागतात – कवयित्री डाॕ.राजश्री देशपांडे.

Sep 6, 2022


मनमाड (प्रतिनिधी) – कविता कवीत निसर्गदत् असली तरी तिला काही पैलू पाडावेच लागतात ,हे करीतअसतांना तिचं अस्सलपण जपावं लागतं,तरच ती जनमान्य कविता ठरते.असे मत ज्येष्ठ कवयित्री डाॕ.राजश्री देशपांडे(सातारा) यांनी येथे आयोजित केलेल्या ‘बरखा कविता उत्सव’ या कार्यक्रमात व्यक्त केले.


येथील मनमाड जनहित विकास संस्था,कलाक्षर साहित्य रसिक मंच व साहित्याक्षर प्रकाशन यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बरखा कविता उत्सवांतर्गत झालेल्या ‘कवी समजून घेतांना…!’ या कार्यक्रमात त्या पुढे म्हणाल्या की, माणसाचे मन व्यक्त व अव्यक्त अशा दोन पातळ्यांवर कार्य करीत असते व भावभावनांचा स्तर रचत असते.यातून तीव्रपणे येणारे विचार कवीला लिहतं करीत असतात.


सुरवातीला त्यांनी त्यांच्या ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या काव्यसंग्रहातील काही कविता सादर केल्या. मनोविकार ,मानसिक समस्या याविषयी श्रोत्यांच्या प्रश्नांना त्यांनी आपले वैद्यकीय अनुभव सांगत उत्तरे दिली.प्रसिद्ध लेखक डाॕ.संजय बोरुडे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंवादक होते.
ज्येष्ठ पत्रकार अशोकआप्पा परदेशी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वमान्यवरांचे स्वागत केले तर कवी हेमंत वाले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परीचय करून दिला.


येथील महात्मा ज्योतीराव फुले वाचनालय सभागृहात या बरखा कविता उत्सवांतर्गत दुस-या सत्रात ‘पाऊस-कविता’ हे खुले कवीसंमेलन ज्येष्ठ कवी प्राचार्य श्री.सदाशिव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
पाऊस-कवितांत यावेळी मनमाडकर श्रोते चिंब झाले.कवयित्री किरण के.,मुक्तविहारी,कृष्णा कांबळे,देविदास चौधरी,नाना महाजन,सौ.मंदोदरी पाटील,राजेंद्र दिघे,काशिनाथ गवळी,अमोल खरे,शाहिर अर्जून साळवे,प्रा,सुरेश नारायणे,दत्ता वालेकर,सुनिल पवार,प्रतिभा खैरनार,धनराज दौंड ,आदींसह चाळीसहून अधिक कवींनी यावेळी आपल्या पाऊस-कविता सादर केल्या,कवी संदीप देशपांडे यांनी या कवीसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचलन केले तर कवी जनार्दन देवरे,मनोज गांगुर्डे,प्रा.जे.वाय.इंगळे,सुषमा तिवारी,सीमा वानखेडे,रेखाताई येणारे,चंद्रकांत चौधरी यांनी या बरखा काव्योत्सवाचे संयोजन केले.युवा कवी शांताराम वाघ यांनी आभार मानले.
ब-याच वर्षानंतर शहरात संपन्न झालेल्या या साहित्यिक कविता उत्सवामुळे साहित्य रसिकांना एक नवी सांस्कृतिक व साहित्यविषयक ऊर्जा मिळाल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी सर्व उपस्थित कवींना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. या आगळ्यावेगळ्या कविता-उत्सवात पुणे,परळी,पालघर,मालेगाव,नगर,नांदगाव व घाटनांदूर या महाराष्ट्रातील विविध भागातून साहित्यिक आले होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.