मनमाड : आज गणपती स्थापनेला सहा दिवस झाले असुन सर्व ठिकाणी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण आहे. गेली दोन दिवस अनेक परिवारांमध्ये गौराईचे आगमन झाले होते , या निमित्ताने अनेकांनी सुंदर अशी सजावट करून पर्यावरण पुरक देखावे सादर केले होते. शहरातील इंजिनियर श्री विक्रम चव्हाण आणि अमर चव्हाण , श्री अमोल हिंगमीरे , श्री ऋषिकेश देशपांडे यांनी आपल्या घरी गौराई निमित्ताने पर्यावरण पुरक सुंदर देखावे सादर केले होते.




















