loader image
[ays_poll id=7]

एम. डी.काळे. इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, मध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा .

Sep 6, 2022


नांदगाव : तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री सिद्धबाबा धर्मनाथ जी महाराज सेवाभावी संस्था, संचालित
एम. डी.काळे. इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, मध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा .
तांदुळवाडी येथील एम. डी . काळे इंग्लिश मिडीयम मध्ये ५ सप्टेंबर रोजी “शिक्षक दिन ” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. जसे कुंभार आपल्या मातीला आकार देऊन अनेक भांडी घडवितो किंवा तयार करतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र काम शिक्षक करत असतात. याचे महत्त्व जाणून पाच सप्टेंबर रोजी आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण शाळेमध्ये” शिक्षक दिन” साजरा करीत असतो. आज शाळेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षिका बनवून वर्गावर जाऊन विद्या दानाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन काम केले. सकाळ सत्रांमध्ये शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी वर्गावर जाऊन इतर विद्यार्थ्यांना शिकविले
त्याचप्रमाणे दुपार सत्रांमध्ये शाळेत शिक्षक दिन व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक वर्गाने या ठिकाणी आपापली भाषणातून सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली शिक्षकांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कामाबद्दल माहिती दिली सदर कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश काळे सर व शाळेतील प्रिंसिपल नेहा काळे मॅम यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता खैरनार यांनी केले. त्याचप्रमाणे मनिषा डोखे, ज्ञानेश्वर सुरसे सर यांनी माहीती दिली . कार्यक्रमाचे इतर नियोजन साक्षी अहिरे, वंदना इंगोले, रोशनी ठेंगे, दिपीका बोरसे, व मंजुषा सोनवणे यांनी केले. विद्यार्थी व विद्यार्थिनी जे शिक्षक बनले होते त्यांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.