loader image
[ays_poll id=7]

अंकाई किल्ला येथे सन्मान स्त्रीशक्तीचा गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न

Sep 7, 2022


येवला ता. दि 4 सप्टेंबर 2022 रोजी एक हात मदतीचा निर्धार करूया माणुसकीचा या पत्रकार श्री सुभाष जाधव यांच्या संकल्पनेतून साकार नेहरू युवा ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येवला तालुक्यातील अंकाई किल्ला येथे भेट देऊन गौरव कर्तृत्वाचा सन्मान स्त्रीशक्तीचा गुणगौरव व सत्कार सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणवा
या श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगा नुसार माणसातली माणुसकी जपून एकमेकांना निःस्वार्थ पणे मदत करणे व सहकार्य करणे हाच खरा मानवता धर्म याच अनुसंगाने एक हात मदतीचा निर्धार करूया माणुसकीचा ही संकल्पना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून गरजूना हवे ते सहकार्य जेवढे शक्य होईल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न पत्रकार सुभाष जाधव हे सामाजिक बांधिलकी जपत करत आहेत सर्वाना एकसूत्रांत बांधून सर्वाना सोबत घेऊन अविरत पणे सामाजिक कार्य करीत आहे त्यासाठी एक्सपर्ट टीम चे मोलाचे सहकार्य लाभते यातून विविध उपक्रम राबवत असून त्यातलाच एक फॅमिली उपक्रम दर वर्षी एक किल्ला दर्शन होय या वेळी वर्ष 2 रे अंकाई किल्ला येथे सुरगाणा, येवला, चांदवड तालुक्यातील मोठ्या संख्येने महिलांनी भेट दिली, किल्ल्यावर भेट दिल्यानंतर सायंकाळी किल्या च्या पायथ्याशी छोटे बाबा मंदिरात सर्व महिलांचा गौरव कर्तृत्वाचा सन्मान स्त्री शक्तीचा हा सन्मान प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र याचे वाटप करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती माजी सभापती पंचायत समिती व मार्केट कमिटी येवला डॉ सुधीर जाधव,यांनी मनोगत व्यक्त करताना अंकाई किल्ला व अगस्ती ऋषीं यांचा इतिहास थोडक्यात सांगितला व महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून जगाच्या पाठीवर न डगमगता स्वतःची एक नवी ओळख निर्माण करावी असे प्रेरणादायी विचार व मार्गदर्शन केले व स्वइच्छेने महिलांना एक भाऊ म्हणून बहिणीसाठी सुरगाणा तालुक्यातील महिलांना एक एक साडी भेट वस्तू दिली भाऊ या नात्याने सर्वांना सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचा प्रयत्न करीन असे डॉ सुधीर जाधव यांनी सांगितले तसेच इतरां नी ही आपले विचार मांडून एक हात मदतीचा निर्धार करूया माणुसकीचा या संकल्पनेचे कौतुक केले व सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना मदत व सहकार्य केले पाहिजे असा संदेश ही दिला. प्रमुख मान्यवर उद्योजक नारायण जाधव, आनंदा वैद्य सर, माजी सरपंच नामदेव सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकाई, पत्रकार राजू परदेशी, सतीश परदेशीं,दौलत पवार,प्रकाश पवार, अशोक घडवजे, नाना जाधव सौ योगिता वैद्य मॅडम,योगिता जाधव, सविता जाधव, सविता हिंगले,वैशाली उपाध्ये, सीमा पवार, मानसी वाघ,विमल आस्वाद,रोहिणी पाटील,मंदाबाई केदारे, सुशीला जाधव, आरती जाधव, सुनीता घडवजे, आशा लहरे, रंजना गांगुर्डे, निर्मला भुसारे, यमुना जाधव आदी इतर सर्व महिला व पुरुष उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.