Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मोफत त्वचारोग निदान शिबिर’ व ‘भव्य रक्तदान शिबिरास’ नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Sep 7, 2022

 

 

श्री रुद्र हनुमान सार्वजनिक गणेश मित्र मंडळ,मनमाड यांचे यंदाचे १५ वे वर्ष आहे.विशेष म्हणजे सर्व कुमार वयातील मुलांचे हे मंडळ असून सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक व आरोग्य व पर्यावरण संवर्धन या बाबतीत सेवा देण्यात हे मंडळ अग्रेसर असून वेळोवेळी वस्त्र संकलन तसेच मुक्या प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सेवा तसेच नित्य गोग्रास सेवा आदी उपक्रम राबविण्यात येत असतात.यंदाच्या वर्षी कै. संजय रामचंद्र कांगणे यांच्या स्मरणार्थ ‘मोफत त्वचारोग निदान व औषधी वाटप शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. यात जवळपास 340 च्या वर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी मोफत त्वचा रोग तपासणी तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आले. यावेळी येवला येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मोफत तपासणी ची सेवा दिली. तसेच सलग व्या वर्षी ‘भव्य रक्तदान शिबीराच्या’यंदाच्या 3 ऱ्या वर्षी 125 नागरिकांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. ‘जनकल्याण रक्तपेढी,नासिक’ यांच्या टीमने तसेच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात शहीद दिन साजरा : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीयप्राचार्य डॉ अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात शहीद दिन साजरा : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीय
प्राचार्य डॉ अरुण पाटील

म.गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक 23 मार्च 2022...

read more
बेइंग वूमन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तर्फे मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेस स्पर्धा परीक्षा ग्रंथ भेट

बेइंग वूमन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तर्फे मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेस स्पर्धा परीक्षा ग्रंथ भेट

बेइंग वुमन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी...

read more
अशोक क्रीडा मंडळ आयोजित फिरता चषक कबड्डी स्पर्धेत मनमाड बॉईज संघाने पटकविले विजेतेपद

अशोक क्रीडा मंडळ आयोजित फिरता चषक कबड्डी स्पर्धेत मनमाड बॉईज संघाने पटकविले विजेतेपद

अशोक क्रीडा मंडळ आयोजित फिरता चषक कबड्डी स्पर्धेत मनमाड बॉईज संघाने सम्राट क्रीडा मंडळाचा पराभव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]