loader image
[ays_poll id=7]

ठिणगी वेब न्यूज पोर्टल चे दुसऱ्या वर्षात पदार्पण

Sep 10, 2022

१० सप्टेंबर २०२१, गणेश चतुर्थी च्या शुभमुहूर्तावर मनमाड हुन प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक ठिणगी च्या डिजिटल ठिणगीचा श्रीगणेशा करण्यात आला होता. मनमाड,नांदगाव,चांदवड,येवला,लासलगाव तसेच ह्या तीन ही तालुक्यातील ग्रामीण भागात होणाऱ्या घडामोडी, घटना तसेच साजरे होणारे शैक्षणिक, सामाजिक,राजकीय आणि सांस्कृतिक उपक्रमांना ठिणगी ने अग्रक्रमाने प्रसिध्दी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्या वर्षभरात केलेला आहे. ह्या संपूर्ण वर्षात ठिणगी च्या पोर्टल ला भेट देणाऱ्या व बातम्यांचा वाचकवर्ग दरमासी चढत्या क्रमानेच राहिलेला आहे. ह्या पहिल्याच वर्षात ठिणगी च्या वाचक वर्गाचे व्ह्यूज तब्बल 3,17,000 आणि ठिणगी च्या पेजला भेट देणाऱ्यांची संख्या 2,20,000 आहे. ह्या वर्षभरात परिसरातील बातम्यांना प्रसिध्दी देण्याबरोबरच नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना ठिणगी च्या माध्यमातून प्रसिद्धी देत शासनापर्यंत पोहविण्याचे काम आम्ही ह्या माध्यमातून प्रामाणिकपणे केलेले आहे. ह्या संपूर्ण वर्षभरात इन्स्टंट बातम्यांसाठी वेळोवेळी आम्हाला मदत करणाऱ्या आमच्या संघातील ज्येष्ठ पत्रकार बांधव, नांदगाव येथील पत्रकार बांधव तसेच येवला,चांदवड, लासलगाव येथील पत्रकार बांधव, छायाचित्रकार बांधव ,इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील आमचे सहकारी मित्र यांचे ह्या संपूर्ण वर्षभरात आम्हाला अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. यापुढेही आमच्या सर्व वाचक,हितचिंतक, मित्रपरिवार, पत्रकार बांधव यांच्या सहकार्याने आणि गत वर्षाच्या अनुभवाने येणाऱ्या वर्षात अधिक जोमाने आणि आत्मविश्वासाने ठिणगी ची वाटचाल होईल असे ह्या प्रसंगी म्हणावेसे वाटते. पुनश्च एकदा सर्वांचे आभार आणि अभिनंदन !

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.