loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ११ सप्टेंबर २०२२ – रविवार

Sep 11, 2022


मेष: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस मित्र व सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल.

वृषभ: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार – व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे.

मिथुन: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता व शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही.

कर्क: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल.

सिंह: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे.

कन्या: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

तूळ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद – विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे.

वृश्चिक: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल.

धनु: आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे.

मकर: आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल.

कुंभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल.

मीन: चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.