loader image
[ays_poll id=7]

लम्पी रोगावर उपाययोजना तसेच कांद्याला क्विंटल मागे २००० रुपये अनुदान मिळावे : नांदगाव तालुका शिवसेनेची मागणी

Sep 12, 2022

सध्या लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असून सुस्त पशुवैद्यकीय यंत्रणा चुस्त व दुरुस्त करणेकामी व कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प खरेदी दरा मध्ये वाढ करणेसाठी व कांद्याला क्विंटला 2000 शासकीय अनुदानद मिळणे बाबत आज नांदगाव तहसील कार्यालयात शिवसेनेच्या वतीने तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले. लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होण्याच्या अगोदरच तालुक्यातील सर्व पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात यावी अशी मागणी ह्या वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असता मा. तहसीलदार यांनी त्यांची ही मागणी मान्य करत लवकरच पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.

निवेदनाचा आशय असा संपूर्ण महाराष्ट्रमध्ये लम्पि रोगाचा प्रादुर्भाव जनावरांवर झपाट्याने वाढत असून ह्या रोगामुळे बळीराजाच्या गोधनावर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता असून पशुवैद्यकीय विभागाकडून शेतकऱ्यांना या रोगा संदर्भात योग्य मार्गदर्शन व प्रतिबंध उपाययोजना व लसीकरण तातडीने सुरू करण्यात यावेत तसेच पशुरोगावर तालुक्यातही पशुवैद्यकीय सुस्त यंत्रणा चुस्त दुरुस्त करण्यात यावी व सातत्याने कांद्याच्या च्या भावात घसरण झाल्याने व उत्पादन खर्चा एव्हढाही भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने भावात शेतकऱ्यांना त्वरित किंट्टल मागे 2000 रुपयाचे अनुदान देण्यात यावे तसेच योग्य माफक भाव मिळावे म्हणून भाव वाढीसाठी शासनातर्फे उपाय योजना करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
या मागणीसाठी हे निवेदन नांदगाव ता शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. शासन व प्रशासनाने या बाबीची योग्य व गंभीर दखल घेऊ शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारिया, तालुका प्रमुख संतोष गुप्ता, उप तालुका प्रमुख शशीकांत मोरे, दिनेश केकान, लिकायत शेख, अनिल दराडे, स्वराज देशमुख, विजय मिश्रा, राजाभाऊ आहेर, शैलेश सोनवणे,प्रमोद पाचोरकर, संजय पवार, सागर सांगळे,प्रवीण धाकराव, दिलीप नंद,अशोक चोळके, मुराद शेख, संजय बच्छाव, सनी फसाटे, निवृत्ती गुंजाळ, रामकृष्ण शिपणकर,लक्ष्मण झाडे, मधुकर झाडे,मधुकर सानप, दत्तातय चोळके, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.