loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था – आमदार कांदे यांनी घेतली दखल

Sep 13, 2022


मनमाड शहर अमरधाम मधील ओट्यांच्या दुर्दशेसंदर्भात तसेच तेथील प्रश्नांसंदर्भात मागील आठवड्यात शिवसेना उपशहर प्रमुख परेश (छोटू) राऊत यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पटेल यांना निदर्शनास आणून दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार आज मनमाड शहर शिवसेना कोअर कमिटी सदस्यांनी शहरातील स्मशान भुमीला भेट देऊन तेथील विविध समस्या जाणुन घेतल्या. स्मशान भूमीचे पुर्णपणे तुटलेले ओटे, लोखंडी जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहे तसेच तेथील संरक्षण भिंत पडलेली आहे. लाईटची व्यवस्था नसून, अर्धवट पेवर ब्लॉक बसवलेले आहेत या सर्व समस्या संदर्भात शिवसेना मनमाड कोअर कमिटी सदस्यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांना अवगत केले.चीफ ऑफिसरला बोलुन घेऊन आमदार कांदे यांनी लागलीच मुख्याधिकारी पटेल यांना दोन दिवसात हे काम चालु करण्याबाबत आदेश दिले.


या वेळी कोअर कमिटी सदस्य राजाभाऊ भाबड, सुनिल हांडगे, वाल्मीक आप्पा आंधळे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, योगेश इमले, अजीज शेख, विकास वाघ, ललित रसाळ, आसिफ शेख, मुकुंद झाल्टे, जाफर मिर्झा, लोकेश साबळे, महेन्द्र गरूड, अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, नंदु पिठे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.