loader image
[ays_poll id=7]

कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न

Sep 13, 2022


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन झोनल कार्यकारिणी मध्य रेल्वे, (मुंबई) तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा (मुंबई) मध्ये कोरोणा काळात आपले कर्तव्य बजविण्या-या डॉक्टर,नर्स व इतर रेल्वे कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रेल्वे हॉस्पिटल च्या एम.डी.डॉ.मीरा अरोरा, डॉ. सविता गांगुर्डे, डॉ.माटे, झोनल अध्यक्ष बी.के.खोईया, झोनल कार्याध्यक्ष हेमंत जाधव, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल अतिरिक्त सचिव अशोक खरे, झोनल खजिनदार अमर वाडते, झोनल वरिष्ठ उपाध्यक्ष सुधीर जंजाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोनल अध्यक्ष बी.के.खोईया हे होते. डॉ.मिरा अरोरा व डॉ माटे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉ.मीरा अरोरा, डॉ.माटे, झोनल कार्याध्यक्ष हेमंत जाधव, झोनल अध्यक्ष बी.के.खोईया आदी चे भाषणे झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रेल्वे हॉस्पिटल भायखळा (मुंबई) डॉक्टर नर्स व इतर रेल्वे कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. कोरोणा काळानंतर सुंदर व देखना कार्यक्रमाचे आयोजन असोसिएशन च्या झोनल कमिटी ने केले.या कार्यक्रमापासून आम्ही प्रेरणा घेऊन या सारखे स्वरूप असलेला कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा प्रयत्न करू, तसेच रेल्वे हॉस्पिटल मध्ये कंत्राटी डॉक्टर व कामगार यांच्या ऐवजी कायम स्वरुपी डॉक्टर व कामगारांची नियुक्ती करण्यासाठी असोसिएशन रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करून सदर मागणीला न्याय देतील अशी अपेक्षा या कार्यक्रमाद्वारे करते असे उद्गार डॉ.मीरा अरोरा यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी केले तर आभारप्रदर्शन झोनल कोषाध्यक्ष अमर वाडते यांनी केले.
यावेळी माजी झोनल कोषाध्यक्ष मधुकर जाधव, मुंबई मंडळ चे अध्यक्ष अमोल खुचेकर, सचिव बिजेद्र सिंग, पुणे मंडळ चे अध्यक्ष किशोर पाटील, सचिव नितीन वानखेडे, नागपूर मंडळ चे अध्यक्ष सुधाकर गायकवाड, सचिव सांगोले सोलापूर मंडळ चे अध्यक्ष सचिन बनसोडे, सचिव टि.व्ही.वाघमारे, भुसावळ मंडळ चे सचिव आर.सी.रावत, अतिरिक्त सचिव तुकाराम तायडे, नाशिक रोड अतिरिक्त मंडळ चे अध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे, सचिव मिलिंद देहाडे, मनमाड अतिरिक्त मंडळ चे सचिव प्रवीण अहिरे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड,परेल अतिरिक्त मंडळ चे कार्याध्यक्ष उल्हास पगारे, सचिव दिपक संसारे,मांटुगा अतिरिक्त मंडळ चे अध्यक्ष आकाश खरात, सचिव संदीप गोरेगावकर, भायखळा एस.एन.टी.अतिरिक्त मंडळ चे अध्यक्ष हेमंत बगाडे, सचिव योगेश थोरात, भायखळा प्रिंट प्रेस अतिरिक्त मंडळ चे अध्यक्ष राजेंद्र भालेराव, सचिव संजय शिंदे, भुसावळ पि.ओ.एच.अतिरिक्त मंडळ चे अध्यक्ष शांताराम जाधव, सचिव एन.एम.निबोलकर, कुर्डुवाडी अतिरिक्त मंडळ चे अध्यक्ष मोहन खंडाळे आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई मंडळ,परेल अतिरिक्त मंडळ, भायखळा एस.एन.डी.अतिरिक्त मंडळ, भायखळा प्रिंटिंग प्रेस अतिरिक्त मंडळ, आदी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्ते यांनी केले.

 


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.