loader image
[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून देण्यासाठी युवासेना भालुर तर्फे नांदगाव बस डेपो ला निवेदन

Sep 14, 2022

दिनांक १४/०९/२०२२ बुधवार रोजी नांदगाव ते भालुर मार्गावरील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करणे व बसचा वेळ बदलणे बाबत नांदगाव बस आगारातील आगारप्रमुखांना युवा सेने तर्फे निवेदन देण्यात आले

कोविड – १९ लॉकडाऊन मध्ये १:३० वाजता नांदगाव ते भालुर बस चालू होती ती बंद झाली होती.
पण लॉकडाऊन उघडुन खूप दिवस झाले आहे पण बस सेवा अजून सुरू झालेली नाही त्यामुळे नांदगाव ते भालुर मार्गावरील सर्वच नांदगाव कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे व दुपारी ३ वाजता जी बस आहे तिचा वेळ नांदगाव वरून ४ वाजता करावा कारण काही विद्यार्थ्यांचे कॉलेज ३ ला सुटते त्यामुळे त्यांना ती बस मिळत नाही त्यामुळे त्यांना इतर वाहनांच्या साह्याने यावे लागते मुलींना कधी कधी ५-६ किमी पायी यावे लागते तरी आपण आम्हाला सहकार्य करावे . ह्या पैकी भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या कडे निवेदन हि दिले होते पण त्याची दखल घेतली गेली नाही. निवेदनाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी. असे निवेदन करण्यात आले . याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख संतोषजी गुप्ता , युवासेना भालुर तर्फे आदेश शिंदे व सौरभ निकम उपस्थित होते . त्यासोबत विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी चे पत्रक जोडले होते.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.