loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील मुस्लीम बहूल गुलझारवाडी येथे महिलांसाठी कोचींग क्लासेस प्रशिक्षण संपन्न

Sep 14, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव शहरातील माजी नगरसेवक दिवंगत इकबाल दादा शेख कोचिंग क्लासेस मार्फत शिवण क्लास व मेहंदी क्लासच्या १०० प्रशिक्षणार्थी, विद्यार्थिनी व महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.


नांदगाव शहरातील गुलझारवाडी येथील दाऊद भाई शेख यांच्या विशेष प्रयत्नातून शहरातील अल्पसंख्याक वस्ती गुलजार वाडीत मुस्लीम समाजाच्या गरीब होतकरू विद्यार्थीनीना तसेच माता भगिनींना काही व्यावसायिक कला कौशल्य शिकायला मिळावे हा उद्देश डोळयासमोर ठेवून त्यांना आपल्या पायावर उभे राहता येईल व आत्मसन्मानाने जगता येईल या उदात्त भावनेने दाऊद भाईंनी आपन स्वतः समाजाचे देणे लागतो हीच भावना मनात ठेवून आपल्या स्वताच्या नावाला मागे ठेउन आपण ज्यांना आदर्श मानतो असे दिवंगत इकबाल दादा शेख यांच्या नावाने जेणे करून त्यांच्या आत्म्यास ही पुण्य लाभेल या पवित्र हेतूने दिवंगत इकबाल दादा शेख या नावाने कोचिंग क्लासेस अंतर्गत शिवण क्लास व मेहंदी क्लासचे प्रशिक्षण अत्यंत यशस्वीरित्या चालवून आज प्रशिक्षण पूर्ण झालेल्या १०० माता भगिनींना शिवण क्लास व मेहंदी क्लासचे प्रमाणपत्राचे वाटप करून सांगता केली. समाजातील अनेक मान्यवरांनी दाऊद भाई यांच्या भावना समजून त्यांना साथ दिली कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक याकुब दादा शेख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महिला जिल्हा मुस्लीम उत्कर्ष समिती अध्यक्षा फरिदा काझी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलझारवाडी येथील मोहसीन खाटीक,शरीफ सम्राट, शाकीर पठाण, सफरभाई , बाबा भाई,जकी शेख, आवेस पठाण, सबदर भाई, फज्जू भाई, रफिक भाई, वसीम शेख, इत्यादींनी प्रयत्न केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.