loader image
[ays_poll id=7]

मनमाड ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीचे आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे

Sep 15, 2022


मनमाड शहरातील विविध नागरी सोयी सुविधा आणि समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनमाड ज्येष्ठ नागरीक संघर्ष समितीतर्फे नगरपरीषद कार्यालयाचे प्रवेशद्वारासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले धरणे आंदोलनातील आंदोलकांनी दि. १५ गुरूवार पासुन आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर संघर्ष समितीने मांडलेले विविध प्रश्न येत्या काही दिवसात निकाली काढण्याचे लेखी आश्वासन नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांनी आंदोलनकर्त्यांना दिले . त्यामुळे हे आंदोलन तूर्तास थांबविले असुन दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
शहराला १५ दिवसाआड अनियमित होणारा पाणीपुरवठा , ढासळलेली अंतर्गत वितरण व्यवस्था , निकृष्ठ दर्जाचे रस्त्याचे बांधकाम , रस्त्यावरील अस्वच्छता व अतिक्रमण , सार्वजनिक स्वच्छता गृहांची दुरावस्था , स्मशानभूमीची दुरावस्था , मोकाट जनावरांचा सुळसुळाट या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरीक संघर्ष समितीने सोमवारपासून धरणे आंदोलन सुरू केले होते . व गुरूवारपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता . विविध राजकिय पक्ष , सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला . बुधवारी हे आंदोलन सुरू असतांना मुख्याधिकारी डॉ . पटेल यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून नागरी समस्यांबाबत चर्चा केली. या चर्चेत अध्यक्ष राजेंद्र पारीक , कार्याध्यक्ष नरेंद्र कांबळे , सचिव एस.एम. भाले व संघर्ष समितीचे पदाधिकारी या चर्चेत सहभागी झाले.उपरोक्त कालावधीत काम पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. शहराला सात ते आठ दिवसाआड पाणी पुरवठा होवू शकतो कां ? याबाबत नगरपरीषद प्रशासनाचे पाणीपुरवठा अधिकारी आणि संघर्ष समिती यांची बैठक येत्या आठ दिवसांत होणार आहे . रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत पोलिस व न पा प्रशासन यांची बैठक घेवून निर्णय घेतला जाईल . शहरांतील मोकाट जनावरांकरीता वागदर्डी येथे कोंडवाड्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.शहरांतील रस्ते व स्वच्छता गृहांची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत . शहरांतील स्मशानभूमीचे काम युध्द पातळीवर हाती घेवून ते दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे , असे लेखी पत्र मुख्याधिकारी डॉ . पटेल यांनी नगरपरीषद प्रशासनातर्फे दिले.
या आंदोलनासाठी उपाध्यक्ष दिलीप आव्हाड , कृष्णाजी पगारे , आर.बी.ढेंगळे , गोपीनाथ गायकवाड , रामभाऊ गवळी , गणपत पगारे , एस.पी..देवकर , श्रीकांत साळसकर , डॉ . एम . एम.बहादूरे यांनी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.