Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी: व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Sep 15, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

मालेगाव येथून नांदगाव येथे येण्यासाठी सांयकाळी ७ वाजेनंतर एकही बस नसल्याने नांदगाव व्यापारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे
याबाबत वृत असे की नांदगाव शहराचे अर्थिक दळणवळण मालेगाव शहराशी निगडीत आहे. विविध आजारा वरील दवाखाने मालेगाव येथे आहे तसेच किराणा मालाची मोठी बाजारपेठ सोयगाव व टेहरे येथे आहे. नांदगाव शहरातून मोठा व्यापारी वर्ग मालेगाव शहराशी निगडीत असून रोज या ठिकाणी बरेचशे व्यापारी विविध सामान खरेदी करण्यासाठी ये जा करीत असतात . तसेच विविध आजारा वरील पेशंट या ठिकाणी नियमीत तपासणी साठी ये – जा करीत असतात . असे असताना सांयकाळी ७ वाजेनंतर एकही बस मालेगाव येथून नांदगावला येण्यासाठी नाही.या अगोदर सदर बससेवा सुरु होती. पंरतू कोवीड च्या आपद्ग्रस्त स्थितीत सदर बससेवा बंद झाली होती . त्यामुळे प्रवाशी वर्गाचे मोठया प्रमाणावर हाल होत आहे. बरेचशा प्रवाशाना रात्री ७ वाजेनंतर मनमाड मार्गे नांदगाव येथे यावे लागते तरी नांदगाव आगाराने प्रवाशांच्या भावनाचा विचार करून त्वरीत सायंकाळी ७ वाजे नंतर ८ व ९ वाजता मालेगाव हून नांदगावला येण्यासाठी बस सुरू करावी अन्यथा रस्ता रोको सारखे मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे निवेदन नांदगाव शहर व्यापारी संघटनेने नांदगाव आगार प्रमुखांना दिले. निवेदनावर प्रकाश कंळत्री,विजय चोपडा यांची स्वाक्षरी आहे .

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंती निमित्त ‘बौद्धिक स्वामित्व हक्क’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंती निमित्त ‘बौद्धिक स्वामित्व हक्क’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर...

read more
म.सा. शिवजयंती उत्सव समिती तर्फे HAK हायस्कुल व ईकरा उर्दू गल्स हायस्कुल येथे निबंधस्पर्धेचे  पारितोषिक वितरण संपन्न

म.सा. शिवजयंती उत्सव समिती तर्फे HAK हायस्कुल व ईकरा उर्दू गल्स हायस्कुल येथे निबंधस्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनमाड शहरात सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे शहरात विविध...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]