loader image
[ays_poll id=7]

चांदवड देवळा परिसरात झालेल्या नुकसानीचे तत्काळ प्रस्ताव बनवून भरपाई देण्याची मागणी : आमदार राहुल आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

Sep 15, 2022


चांदवड व देवळा तालुक्यात पर्जन्यमानामुळे वातावरणामुळे उन्हाअभावी फळपीक भाजीपाला पीक व खरीपातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात येवून आर्थिक भरपाई मिळावी तसेच याकामी प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा अशी मागणी आ.डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाधारण डी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात आ.डॉ. राहुल आहेर यांनी चांदवड देवळा मतदार संघात् गेल्या काही दिवसांपासून मोट्या प्रमाणात पर्जन्यमान होत आहे .परंतु चांदवड व देवळा तालुक्यातील काही गावांमध्ये शासनाच्या विहित मापदंडा इतके पर्जन्यमान झालेले नसले तरीही हवेचा तीव्र वेग व ढगाळ वातावरणामुळे उन्हाअभावी तशेच वादळ सदृश्य परिस्थिती यामुळे भाजीपाला पिके व फळ पिके व खरीपातील इ.पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या नैसर्गिक संकटामुळे पिके खराब झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

चांदवड व देवळा तालुक्यातील काही गावांमध्ये शासनाच्या विहित मापदंडा इतके पर्जन्यमान जरी झालेले नसले तरी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला देण्यात यावे तसेच झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई मिळणे बाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा अशी मागणी आमदार राहुल आहेर यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.