loader image
[ays_poll id=7]

नांदगाव कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पेटंट विषयक व्याख्यान संपन्न

Sep 16, 2022


नांदगाव – (सोमनाथ घोंगाणे)
नांदगाव येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पेटंट विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील महाविद्यालयात आज १६ सप्टेंबर २०२२ रोजी महाविद्यालयीन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत एका ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून पुणे येथील मॉडर्न विधी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अनन्या बिबवे या लाभल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन शिंदे हे होते. डॉ. बिबवे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आणि पेटंटिंग या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी पेटंटिंग, कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंटिंग प्रक्रिया, यांसाठी अर्ज कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. आपण केलेले एखादे संशोधन किंवा तयार केलेली नवीन माहिती, वस्तू किंवा संकल्पना बौद्धिक संपदा हक्काच्या अंतर्गत कशी आणावी आणि का आणावी या आणि अशा अनेक मुद्द्यांची उपस्थितांना माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिंदे यांनी उपस्थितांना तसेच पाहुण्यांना मराठा विद्या प्रसारक संस्था तसेच महाविद्यालयाविषयी माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी या महत्वपूर्ण व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, आय क्यू एस सी प्रमुख डॉ. विठ्ठल सोनवणे, श्री,अजय लवंगे, डॉ. संतोष जाधव, डॉ. अनिल तिदार, श्री पी एस बागुल, आदी प्राध्यापक आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रस्ताविक डॉ.भागवत चवरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. विठ्ठल सोनवणे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.