loader image
[ays_poll id=7]

चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण न्यू इंग्लिश स्कूल येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत पोषण महा अभियान संपन्न

Sep 16, 2022


(सुभाष जाधव,चांदवड)दिनांक 16 सप्टेंबर रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण महा अभियान सर्वत्र राबविण्यात आले असून धोंडगव्हाण येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्तिथ हे अभियान राबविण्यात आले,


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी श्री महेश पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले पोषण महा अभियान यामध्ये महिलांना पाककृती तील जीवनसत्व याचे महत्व पटवून दिले. सरपंच सौ मनीषा पुरकर,यांनी सकस आहार घेतल्याने जीवनमान उंचावते व आरोग्य दायी बनते, अशी माहिती दिली,,यावेळी ग्रामसेवक पाटील,उपसरपंच सुनील चौरे,सदस्य मंगला पुरकर, संगीता पुरकर, रामनाथ पुरकर, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती कोल्हे मॅडम अंगणवाडी पर्यवेक्षीका , अंगणवाडी कार्यकर्ते शोभा तिडके, लता सुबंध, मंगला प्ररदेशी, तसेच मदतनीस यांनी परिश्रम घेतले.


आरोग्य विभागा मार्फत किशोरवयीन मुलींचे रक्तक्षय तपासणी व यामध्ये कीशोरवईन मुलींमध्ये होणारे बदल याबाबत माहिती व इतर आजाराविषयी माहिती श्रीमती घोटेकर मॅडम,व डॉक्टर कामिल खान यांनी दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे नियोजनासाठी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या मधील श्री इंगळे सर, चौधरी सर, वाघ सर, शिंदे सर, बसते मामा, कागदे सर कमांकर व आशा कार्यकर्ती महिला बचत गटाच्या सौ टीना परदेशी व महिलांनी सहकार्य केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.