loader image
[ays_poll id=7]

छत्रे हायस्कूल मध्ये हिंदी दिवस साजरा

Sep 17, 2022


मनमाड हिंदी ही आपली राष्ट्र भाषा असून हिंदी भाषेला देशभरात मानाचे स्थान दिले जाते.हिंदी पढो ,आगे बढो, भारत जोडो हे ब्रीद साकार करण्यासाठी सर्वांनी हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करावा असे प्रतिपादन छत्रे विद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख शिक्षक मंगेश वाणी यांनी केले.14 सप्टेंबर हिंदी दिना निमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.आपल्या भाषणात श्री वाणी सरांनी स्वातंत्र्य मिळण्याआधी व नंतर हिंदी भाषेचे योगदान, सर्व केंद्र,राज्य सरकारी,निमसरकारी कार्यालये, न्यायालये,या ठिकाणी हिंदीचे वाढते महत्व, राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी हिंदीचे महत्व या विषयी अभ्यासपूर्ण विचार मांडले. यासह काही आधुनिक हिंदी कविता सादर करत देशातील नागरिकांनी राष्ट्रीय स्तरावर संपर्क भाषा म्हणून हिंदीचा वापर करावा असे आवाहन श्री वाणी सर यांनी शेवटी केले.
यावेळी संस्थेचे सचिव दिनेश धारवाडकर, संचालक प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, वरिष्ठ पर्यवेक्षक प्रविण व्यवहारे, पर्यवेक्षिका संगीता पोतदार आदी उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थी वर्गाला हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.