loader image
[ays_poll id=7]

रेल्वे खाली सापडून युवक मृत्युमुखी

Sep 17, 2022


मनमाड शहरापासून जवळ असलेल्या एकवई येथील २६ वर्षीय तरुणाचा लोहमार्ग ओलांडताना रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी मनमाड – भुसावळ लोहमार्गावर घडली. या घटनेने एकवई गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरापासून ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या एकवई (ता.नांदगाव) येथील जनार्दन रामभाऊ बेदाडे,वय-२९ हा तरुण मनमाड येथे हमालीचे काम करीत होता.मात्र आज शुक्रवारी मनमाडहून दुपारी घरी जाताना गर्डर शॉप समोर असलेल्या मनमाड – भुसावळ लोहमार्ग ओलांडताना भरधाव वेगाने धावणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने हाता पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होवून जागीच प्राण ज्योत माळवली. दरम्यान सदर मृत्यू पावलेला तरुण हा आई-वडिलांना एकुलता एक होता.तर त्यांची घरची परिस्थिती नाजूक असल्याने वडील आणि तो शहरात मिळेल ते काम करीत होते. असे बोलले जात असून त्याने परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.मात्र सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव असलेल्या जनार्दनचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.