माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील उपशिक्षक श्री जितेंद्र श्रावण वाले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांचे कडून राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार रविवार दि 11/9/2022 रोजी प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार अभिनेते संदीप सोमण, आंतररा्ट्रीय किर्तीचे जादूगार सतिश देशमुख, समाज सेवक दिपक नागरगोजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारात स्मृती चिन्ह प्रमाणपत्र, मनाचा फेटा, गोल्ड मेडल, डायरी, पुस्तक व पेन देण्यात आले.
या पूर्वी मागील वर्षी त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन तीन नामांकित संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची येवला भाजपची मागणी
येवला - राजकीय षडयंत्राच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी व पक्षांच्या कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे...











